'महिलांना शिक्षण घेता येईल पण...' तालिबान सरकारचा अजब फतवा

महिलांच्या शिक्षणाशी (Womens Education)संबंधित नवीन नियम तालिबानने (Taliban government) जारी केले आहेत.
'महिलांना शिक्षण घेता येईल पण...' तालिबान सरकारचा अजब फतवा
Taliban government allows girls to study in university but with this Talibani rulesDainik Gomantak

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबान सरकारचे (Taliban Government) राज्य सुरू होताच तालिबानने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. यात महिलांच्या शिक्षणाशी (Womens Education)संबंधित नवीन नियम तालिबानने जारी केले आहेत. तालिबान सरकारने महिंलांना शिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे पण त्याचबरोबर त्यांच्यावर अनेक अटीही ठेवल्या आहेत.(Taliban government allows girls to study in university but with this Talibani rules)

या नवीन नियमांबद्दल बोलताना अफगाणिस्तानचे उच्च शिक्षण मंत्री (Afghanistan Educational Minister) यांनी सांगतले आहे की पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासासाठी महिला विद्यापीठांमध्ये जाऊ शकतात, परंतु मुले आणि मुलींचे स्वतंत्र वर्ग असतील आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिलांना इस्लामिक कपडे परिधान करणे अनिवार्य असणार आहे.

Taliban government allows girls to study in university but with this Talibani rules
'ती मंत्री होऊ शकत नाही, महिलांनी फक्त जन्म द्यावा'

अफगाणिस्तानच्या नवीन राज्यकर्त्यांनी तालिबान सरकार स्थापन केल्यानंतर काही दिवसांनी मंत्री अब्दुल बाकी हक्कानी (Abdul Baqi Haqqani) यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत सरकारची नवीन धोरणे मांडली आहेत . हक्कानी म्हणाले की, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनिंना हिजाब घालणे आवश्यक असेल, परंतु त्यांनी फक्त हेडस्कार्फ किंवा संपूर्ण चेहरा झाकणे आवश्यक आहे की नाही हे स्पष्ट केले नाही.

“आम्ही मुला -मुलींना एकत्र अभ्यास करू देणार नाही. आम्ही सहशिक्षणाला परवानगी देणार नाही."त्याचबरोबर हक्कानी यांनी विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या विषयांचाही आढावा घेतला जाईल असे स्पष्टीकरण दिले आहे तालिबानने त्यांच्या आधीच्या राजवटीतही संगीत आणि कलेवर बंदी घातली होती.

Taliban government allows girls to study in university but with this Talibani rules
तालिबान सरकारला मान्यता देण्यास घाई नाही: व्हाईट हाऊस

दरम्यान सरकार स्थापनेनेनंतर तालिबानने अनेक नियम लादले असलेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर तालिबानचे प्रवक्ते सय्यद जकारुल्लाह हाशिमी (Syed Zakarullah Hashimi) यांनी महिला मंत्री होऊ शकत नाही, तुम्ही तिला एकादी जबाबदारी दिली तर ती पेलू शकत नाही. त्यामुळे महिलांना मंत्रिमंडळात स्थान न देणेचं योग्य आहे. त्यांचा जन्म फक्त मुलांना जन्म देण्यासाठी झाला आहे. महिला आंदोलक "अफगाणिस्तानच्या सर्व महिलांचे प्रतिनिधित्व करु शकत नाही.असे सांगत आपले इरादे स्पष्ट केले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com