तालिबान महिलांचा द्वेषचं करतंय; संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी झापले

तालिबान आणि अमेरिका (America) यांच्यात रविवारी दोहा येथे संपन्न झालेल्या पहिल्या दोन दिवसीय बैठकीनंतर त्यांचे हे वक्तव्य आले.
तालिबान महिलांचा द्वेषचं करतंय; संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी झापले
Secretary General of the United Nations Antonio GuterresDainik Gomantak

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) यांनी तालिबान्यांना (Taliban) महिलांना दिलेल्या आश्वासनांचे खंडन केल्याबद्दल जोरदार फटकारले आहे. त्यांनी तालिबान्यांनी महिलांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्याचबरोबर ते आवाहनही करत आहेत की, देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे, त्यामुळे जगाने आर्थिक मदत केली पाहिजे. तालिबान आणि अमेरिका (America) यांच्यात रविवारी दोहा (Doha) येथे संपन्न झालेल्या पहिल्या दोन दिवसीय बैठकीनंतर त्यांचे हे वक्तव्य आले.

अमेरिकेने या बैठकीनंतर म्हटले होते की, तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर तेथील महिलांच्या हक्कांचे उच्चाटन करण्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. याविषयी चिंता व्यक्त करताना संयुक्त राष्ट्र प्रमुख म्हणाले की, आम्ही स्वत: देखील चिंतित आहोत की, तालिबानने महिलांना दिलेली आश्वासन पाळली नाहीत. तालिबानने महिलांना दिलेली आधीची आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि तेथील मानवाधिकारांचे (human rights) उल्लंघन कमी करण्यास मदत करण्यास आम्ही तयार आहोत असंही यावेळी स्पष्ट केले आहे.

Secretary General of the United Nations  Antonio Guterres
तालिबान आणि अमेरिकेत पहिल्यांदाच चर्चा

दरम्यान, ते म्हणाले की, जगाने अद्याप तालिबानला ओळखले नाही, ज्याने ऑगस्टमध्ये आपले सरकार स्थापन केले. गुटेरेस म्हणाले की, तालिबानने आश्वासनांना नकार दिल्यानंतरही असे होणार नाही की इथल्या स्त्रियांची स्वप्नेही चिरडली जातील. 2001 नंतर अफगाणिस्तानातील सुमारे 30 लाख मुलींनी शालेय शिक्षणासाठी नोंदणी केली होती. गेल्या दहा वर्षांच्या काळात येथील मुलींच्या शिक्षणात मोठी प्रगती झाली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान अभूतपूर्व होते.

तसेच, गुटेरेस यांनी इशारा दिला आहे की, अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था अभूतपूर्व संकटातून जात आहे. महिलांच्या योगदानाशिवाय अफगाणिस्तानच्या सुधारणेची कल्पना केली जाऊ शकत नाही. महिलांना समान अधिकार दिल्याशिवाय देश प्रगती करु शकणार नाही आणि याला पर्यायही असू शकत नाही. विकासासाठी दिलेली मदतही आंतरराष्ट्रीय समुदयाने थांबवली आहे.

Secretary General of the United Nations  Antonio Guterres
तालिबान राजवटीत आता शिक्षणही 'अवैध', सरकारचा अजब कायदा

शिवाय, संयुक्त राष्ट्र प्रमुख म्हणाले की, आपल्याला देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचे मार्ग शोधावे लागतील. हे केवळ आंतरराष्ट्रीय नियमांनुसार केले जावे. अफगाणिस्तानची बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी जगाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी जगाला केले. अफगाणिस्तानच्या भल्यासाठी त्वरित कारवाई करण्याची गरज आहे.

Related Stories

No stories found.