तालिबानची ISIS विरोधात मोठी कारवाई

रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
तालिबानची ISIS विरोधात मोठी कारवाई
Taliban launches campaign against ISIS, four terrorists killed in Kandahar Dainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, तालिबानने (Taliban) सोमवारी कंदाहार (Kandahar) प्रांतात इस्लामिक स्टेट खोरासान आणि इराक युनिट्सच्या विरोधात मोहीम सुरू केली. रविवारी मध्यरात्रीनंतर सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईत तीन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

अफगाणिस्तानच्या स्तहनिक वृत्तपत्राच्या माहितीनुसार, प्रांतातील अधिकाऱ्यांनी कळवले की तालिबानने कंदाहार प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये दहशतवादी संघटनेच्या सदस्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. ISI च्या दहशतवाद्यांनी एका खोलीत स्फोट करून स्वत:ला उडवून दिल्याची अफवा पसरली आहे. या कारवाईत कोणत्याही तालिबानच्या जीवितहानी झाल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली नाही.

Taliban launches campaign against ISIS, four terrorists killed in Kandahar
जपानमध्ये बुस्टर डोस देण्याची तयारी सुरू

काबूलमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट, दोन जण जखमी

वृत्तानुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या कोटा-ए-सांगीमध्ये सोमवारी बॉम्बस्फोट झाला, जेव्हा एक टॅक्सी रस्त्यावरून जात होती. काबूल पोलिसांसाठी काम करणारे तालिबानचे प्रवक्ते मोबिन यांनी सांगितले की, या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये टॅक्सीत बसलेल्या एका महिलेचा समावेश आहे, तर घटनास्थळावरून जात असणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामिक स्टेट-खोरासान (IS-K) या दहशतवादी संघटनेने शनिवारी शहरात मिनी बस बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात किमान 20 जण ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com