गझनवीच्या थडग्यावर पोहचला तालिबानी नेता, सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाचा केला उल्लेख

तालिबानचा नेता अनस हक्कानी (Anas Haqqani) मंगळवारी महमूद गझनवीच्या थडग्यावर पोहोचला होता .
गझनवीच्या थडग्यावर पोहचला तालिबानी नेता, सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाचा केला उल्लेख
Taliban leader Anas Haqqani visited to Mahmud Ghaznavi Shrine Dainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची सत्ता (Taliban) येऊन दीड महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे आणि आता तालिबानने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तालिबानचा नेता अनस हक्कानी (Anas Haqqani) मंगळवारी महमूद गझनवीच्या थडग्यावर पोहोचला होता .येथे पोहोचल्यावर त्याने गझनवीचे (Mahmud Ghaznavi) कौतुक करत गझनवीने सोमनाथ मंदिर पाडल्याचाही उल्लेख केला आहे .(Taliban leader Anas Haqqani visited to Mahmud Ghaznavi Shrine)

महमूद गझनवीने गुजरातमधील सोमनाथ मंदिराचा नाश केला. त्याने भारतावर 17 वेळा हल्ला केला होता. अनस हक्कानी त्याच्या दर्ग्यात पोहोचला होता . येथे पोहोचल्यावर, हक्कानीने अभिमानाने सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाचा उल्लेख केला आहे .

हक्कानी याने ट्विट करत , 'आज आम्ही 10 व्या शतकातील मुस्लिम योद्धा आणि मुजाहिद महमूद गझनवी यांच्या मंदिरात भेट दिली. गझनवीने मजबूत मुस्लिम राजवट स्थापन केली होती आणि सोमनाथचा पुतळा नष्ट केला होता.' असे म्हणत त्याने आपला रंग दाखवलं आहे.

Taliban leader Anas Haqqani visited to Mahmud Ghaznavi Shrine
Taiwan-China Clash: तैवान चा 'ड्रॅगन' ला इशारा

भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये महमूद गझनवीने हल्ला केला होता. असे म्हटले जाते की अरब प्रवासी अल-बिरुनी यांच्या प्रवासवर्णनात मंदिराचा उल्लेख पाहिल्यानंतर गझनवीने सुमारे 5 हजार साथीदारांसह या मंदिरावर हल्ला केला होता. त्याने मंदिराची मालमत्ताही लुटली. सोमनाथ मंदिरावर आधी आणि नंतर अनेक वेळा हल्ला झाला आणि ते मंदिर पाडण्यात आले पण प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार हे मंदिर शेवटच्या वेळी पुन्हा बांधण्यात आले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

Related Stories

No stories found.