तालिबानचे नेते काबुलमध्ये; सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरु

Afghanistan: अतिरेकी संघटनांचे कमांडर, माजी सरकारी नेते आणि धर्म प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानचे नेते पोहोचले असल्याचे समजते आहे.
Taliban leader Mullah Baradar
Taliban leader Mullah BaradarDainik Gomantak

तालिबानचा (Taliban) सह-संस्थापक मुल्ला बरदार (Mullah ghani baradar) हा अतिरेकी संघटनांचे कमांडर, माजी सरकारी नेते आणि धर्म प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पोहोचला आहे. अशी माहिती इस्लामवादी गटाच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी माध्यमांना दिली आहे.

नाटोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तालिबानी बंडखोरांनी राजधानीत प्रवेश केल्यापासून दूतावास आणि आंतरराष्ट्रीय मदत गटांसाठी काम करणाऱ्या सुमारे 12,000 परदेशी आणि अफगाण नागरिकांना काबूल विमानतळावरून बाहेर काढण्यात आले आहे.

नाटोच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, "एअरलिफ्ट करण्याची प्रक्रिया धोक्याची असुन आहे, आम्ही एअरलिफ्टच्या ऑपरेशनमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ करु इच्छित नाही."

Taliban leader Mullah Baradar
काबुल विमानतळावर 150 भारतीय नागरिक सुरक्षित; कागपत्रांसाठी झाली चौकशी

तालिबान्यांनी गेल्या रविवारी राजधानी काबूलमध्ये शस्त्र न चालवता काबुलवर कब्जा केला. मात्र तालिबानी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "आम्ही नागरिकांवर अत्याचार आणि गुन्ह्यांची काही प्रकरणे ऐकली आहेत."

"जर तालिबान सदस्य कायदा आणि सुव्यवस्थेत बाधा निर्माण करत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल, तसेच ते म्हणाले, "आम्ही घाबरणे, तणाव आणि चिंता समजू शकतो. लोकांना वाटते की, आम्ही जबाबदारी घेणार नाही, परंतु तसे होणार नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com