'तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानात घेतले प्रशिक्षण'; इम्रान सरकारमधील मंत्र्याने केले कबूल

मागील अनेक वर्षापासून पाकिस्तान तालिबानला (Pakista-Taliban Relations) मदत करत आला आहे.
'तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानात घेतले प्रशिक्षण'; इम्रान सरकारमधील मंत्र्याने केले कबूल
Sheikh Rashid AhmadDainik Gomantak

अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे अफगाणिस्तानमधील (Afghanistan) लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी (Taliban) आपल्या सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर केला आहे. मात्र दुसरीकडे तालिबान्यांच्या एन्ट्रीने शेजारील देशांबरोबर जगातील देशांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. तालिबानच्या राजवटीला मदत करण्यासाठी पाकिस्तान (Pakistan), चीन, रशियासारखे देश पुढे सरसावले आहेत.

यातच आता पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद (Sheikh Rashid Ahmad) यांनी पाकिस्तानी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मागील अनेक वर्षापासून पाकिस्तान तालिबानला (Pakista-Taliban Relations) मदत करत आला आहे. हम वृत्तवाहिनीच्या 'ब्रेकिंग पॉइंट विथ मलिक' कार्यक्रमात शेख रशीद म्हणाले, 'तालिबानचे सर्व प्रमुख नेते पाकिस्तानमध्ये जन्माला आले आणि तिथेच वाढले. त्याचबरोबर त्यांना आम्ही प्रशिक्षणही दिले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पाकिस्तानवर बऱ्याच काळापासून तालिबानला (Taliban) मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Sheikh Rashid Ahmad
काबुल विमानतळावरुन 150 भारतीयांचे अपहरण? तालिबान्यांनी दिले यावर स्पष्टीकरण

पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी तालिबानला मदत केल्याबद्दल पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय टीकेचा सामना करावा लागत आहेत. तसेच उत्तरा दाखल ते म्हणाले, "मुल्ला बरादर पाकिस्तानच्या तुरुंगात होता." अमेरिकेने आम्हाला त्याला सोडण्यास सांगितले. '' शेख रशीद पुढे म्हणाले, 'आम्हाला पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर शांतता हवी आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर (Pakistan-Afghanistan border) शांततेची मागणी आम्ही जागतिक समुदयाकडे करतो आहे. 'हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तान अधिकृतपणे अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे समर्थन करताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या पडझडीत पाकिस्तानचा हात असल्याचा आरोपही ते नाकारत आहेत.

Sheikh Rashid Ahmad
Afghanistan: तालिबान्यांनी कंधार विमातळावर डागले रॉकेट

अनेक पाकिस्तानी नेत्यांनी तालिबानच्या समर्थनार्थ निवेदने दिली

परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) बुधवारी म्हणाले की, जगाने अफगाणिस्तानला अर्ध्यातच सोडू नये कारण त्याचे भयंकर परिणाम होतील. "अशा हालचालीचे धोकादायक परिणाम होतील आणि काळ कोणालाही माफ करणार नाही," पाकिस्तानच्या नेत्यांची तालिबानशी असलेल्या संबंधांची ही पहिलीच वेळ नाही. काश्मीरमध्ये तालिबान पाकिस्तानला मदत करेल, असे नीलम इर्शाद शेखने यापूर्वी म्हटले होते. पाकिस्तानकडून तालिबानला मदत केल्याबद्दल सर्वांना माहिती आहे. जरी पाकिस्तानने तालिबानपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जगाला चांगलंच ज्ञात आहे.

Sheikh Rashid Ahmad
पाकिस्तानलाही तालिबान्यांनी भीती, देशाच्या सीमा केल्या सील

पाकिस्तान तालिबानला मदत करतोय

23 जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि तत्कालीन अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) यांच्यात झालेल्या शेवटच्या फोन कॉलमध्ये माध्यमांच्या अहवालातून असे उघड झाले आहे की, अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले असून यामध्ये तालिबानला पाकिस्तानचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आधीच पाकिस्तानच्या माध्यमातून अफगाणिस्तानात घुसले आहेत. अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत असद मजीद खान यांनी अलीकडेच पाकिस्तानवरील अशा आरोपांचा बचाव केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com