तालिबानकडून दहशतवाद्यांनाच बक्षिसांची खैरात, पैसे आणि घर देण्याचे आश्वासन

तालिबानने (Taliban) अमेरिकन आणि अफगाण सैनिकांवर हल्ला करणाऱ्या त्यांच्या आत्मघाती हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना जमीन आणि पैशाचे आश्वासन दिले आहे.
Taliban offer money & land to bombers
Taliban offer money & land to bombersDainik Gomantak

तालिबानने (Taliban) अमेरिकन (USA) आणि अफगाण (Afghanistan) सैनिकांवर हल्ला करणाऱ्या त्यांच्या आत्मघाती हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना जमीन आणि पैशाचे आश्वासन दिले आहे. तालिबानचा हा निर्णय स्पष्टपणे दहशतीला (Terrorism) प्रोत्साहन देत असून दहशतवादाला भडकवत असल्याचे दिसत आहे. तालिबान आधीच आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे आणि अशातच तालिबानने ही घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Taliban offer money & land to bombers)

तालिबानचे कार्यवाहक गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी काबुलमधील एका हॉटेलमध्ये जमलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबीयांसोबत झालेल्या बैठकीत बक्षिसांची ऑफर दिली आहे .याबाबत गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सईद खोस्ती यांनी मंगळवारी ट्विट केले की , हक्कानी यांनी सोमवारी संध्याकाळी मेळाव्याला संबोधित करताना आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना शहीद म्हणून घोषित केले आहे . हक्कानीने या आत्मघाती हल्लेखोरांचे वर्णन इस्लाम आणि देशाचे नायक म्हणून केले आहे.

10 हजार अफगाणी डॉलर देऊन जमीन देण्याचे आश्वासन

याच बैठकीच्या शेवटी, हक्कानीने मारल्या गेलेल्या प्रत्येक आत्मघातकी बॉम्बरच्या कुटुंबीयांना जमीन देण्याचे वचन दिले आहे, त्याचबरोबर त्यांना 10 हजार अफगाणी डॉलर देण्याची घोषणा देखील केली आहे.

Taliban offer money & land to bombers
अमेरिकेने इराणवरील निर्बंध उठावावेत: राष्ट्राध्यक्ष रईसी

तालिबानने ही घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा तालिबान स्वतः आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आत्मघाती बॉम्बस्फोटांसाठी बक्षिसांचे आश्वासन तालिबान नेतृत्वातील परस्परविरोधी दृष्टीकोन दर्शवते. अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याच्या तालिबानच्या प्रयत्नाला धक्का बसू शकतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळाल्यानंतर तालिबानने सप्टेंबरमध्ये त्यांचे अंतरिम सरकार स्थापन केले परंतु ते आंतरराष्ट्रीय पाठिंब्याशिवाय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com