तालिबानचा नवा फतवा, महिलांना झाकावं लागणार संपू्र्ण शरीर

शनिवारी अफगाण महिलांना सार्वजनिक ठिकाणी संपुर्ण शरीर झाकणारा बुरखा घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तालिबानचा नवा फतवा, महिलांना झाकावं लागणार संपू्र्ण शरीर
TalibanDainik Gomantak

महिलांच्या हक्कांवरुन आता अफगाणिस्तानमध्ये नवा फतवा लागू करण्यात आला आहे. शनिवारी अफगाण महिलांना सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालण्याचे आदेश तालिबान (Taliban) सरकारकडून देण्यात आला आहे. हा हुकूम तालिबान प्रमुख हैबतुल्ला अखुंदजादा यांनी जारी केला आहे. दरम्यान काबूलमधील एका कार्यक्रमात तालिबान अधिकाऱ्यांनी हा फतवा जारी केल्याचा डॉन वृत्तपत्राने दिला आहे. (Taliban orders women to wear full body veil)

सद्गुणांच्या प्रचारासाठी आणि दुर्गुणांच्या प्रतिबंधासाठी मंत्रालयाने कॅफे आणि दुकानांवर पोस्टर लावले. पोस्टर्समध्ये चेहरा झाकणाऱ्या महिलेचा फोटो होता. फोटोसोबत पोस्टरवर ‘शरिया कायद्यानुसार मुस्लिम महिलांनी हिजाब घालणे आवश्यक आहे’ असा मेसेज नमूद करण्यात आला होता. 1990 च्या दशकात तालिबानी राजवटीत महिलांना बुरखा घालणे अनिवार्य करण्यात आले होते. काबुलमधील स्त्रिया आधीच त्यांचे केस हेडस्कार्फने झाकून ठेवतात, तर काही स्त्रीया काही प्रमाणात पाश्चात्य कपडे घालतात. तथापि, मीडिया आउटलेटनुसार, काबुलच्या बाहेर बुरखा सामान्य आहे.

आता, तालिबानच्या या नव्या फतव्यानुसार अफगाणिस्तानातील प्रत्येक स्त्रीला संपू्र्ण शरीर बुरख्याने झाकावं लागणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तालिबानने आणखी एक दडपशाही निर्देश जारी केला होता की, प्रवास करु इच्छिणाऱ्या अफगाण महिलांना पुरुष नातेवाईक सोबत करावा लागणार. शिवाय, तालिबानने मुलींसाठीच्या सर्व माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीचा जगभरातून निषेध झाला. अनेक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी तालिबानला मुलींच्या माध्यमिक शाळांवरील बंदीबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

दुसरीकडे, तालिबानने शाळेत जाण्यास बंदी घातल्यामुळे इयत्ता सहावीतील अफगाण विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली आहेत. HRW च्या म्हणण्यानुसार, महिला आणि मुलींना आरोग्य सेवा मिळण्यापासून देखील रोखले जाते. हिंसेचा सामना करणार्‍या महिला आणि मुलींना सुटकेचा मार्ग नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.