Taliban In Afghanistan: तालिबान महिलांच्या हक्कांवर पुन्हा अंकुश

तालिबानने आता युनायटेड नेशन्स असिस्टन्स मिशन च्या महिला कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्याचे आदेश दिले आहेत.
Taliban
TalibanDainik Gomantak

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तालिबान (Taliban) राजवट अफगाण महिलांच्या हक्कांवरती सातत्याने अंकुश ठेवत आहे. तालिबानने आता युनायटेड नेशन्स असिस्टन्स मिशन (UNAMA) च्या महिला कर्मचाऱ्यांना हिजाब घालण्याचे आदेश दिले आहेत. (Taliban Restrict Womens Rights Again)

Taliban
मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट करणार

माध्यमांनुसार UNAMA ने वृत्त दिले की तालिबान अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने UN ला सांगितले आहे की महिला कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर रिपोर्टिंग करताना हिजाब घालयचा आहे. UNAMA च्या निवेदनानुसार, तालिबानच्या शिष्टमंडळात पुण्य प्रचार आणि गैरवर्तन प्रतिबंधक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. संघटनेने सोमवारी 16 मे रोजी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत हिजाब घालण्याचे तालिबानचे निर्देश शेअर केले आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, यूएनएमाच्या निवेदनात असेही म्हटले की, हिजाब वापरला जातो की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयाचे कर्मचारी यूएन कार्यालयाबाहेर उभे राहणार आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना हिजाब नसलेली महिला कर्मचारी आढळल्यास, ते हिजाब घालण्याशी "विनम्रपणे" बोलतील कारण बाहेर हिजाब घालणे अनिवार्यच आहे.

ह्यूमन राइट्स विभागाचे सहयोगी संचालक हीदर बार यांनी ट्विट करत म्हटले की, "तालिबानने महिलांसाठी नवीन ड्रेस कोडचा नियम बनवला नसून 'सल्ला' दिला आहे. परंतु त्याची मूलत: हा अंमलबजावणी करण्यात येणार आहे."

तालिबानने UN कार्यालयाबाहेर लावले पोस्टर

याव्यतिरिक्त, UN कार्यालयाबाहेर, मंत्रालयाने महिलांना "हिजाब" घालण्याचे आवाहन करणारे पोस्टर लावले आहे. बॅरने पोस्टरचा एक फोटो देखील ट्विट केला आहे, ज्यामध्ये हिजाबचे उदाहरण म्हणून काळा असलेला निकाब आणि चमकदार निळा बुरखा दखविला आहे. महिलांना हिजाब घालणे अनिवार्य करण्याच्या तालिबान नेत्याच्या नवीन आदेशाचा खुप अफगाण महिला निषेध करत आहेत.

Taliban
मोदी सरकारच्या या निर्णयाला अमेरिकेने घेरले, चीनने दिला पाठिंबा

गेल्या वर्षी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तालिबानने

दावा केला होता की, या वेळी त्यांची सत्ता मागील टर्म म्हणजेच 1996 ते 2001 सारखे नरम असतील. पण तालिबान आपले वचन पाळताना दिसत नाहीये, उलट त्याने महिलांवर आणखी निर्बंध लादले आहेत. महिलांना अनेक सरकारी नोकऱ्या, माध्यमिक शिक्षण आणि त्यांच्या शहरात किंवा अफगाणिस्तानच्या बाहेर एकट्याने प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

दोन तालिबान राजवटींमधील 20 वर्षांमध्ये, मुलींना शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि स्त्रिया सर्व क्षेत्रात रोजगार शोधू शकत होत्या, जरी देश सामाजिकदृष्ट्या पुराणमतवादी राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com