सरकार अस्थिर करू नका, तालिबानचा अमेरिकेला इशारा

मुताकी यांच्या मते, त्यांनी या बैठकीत अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे की, अफगाणिस्तानची अस्थिरता आणि तिथल्या असुरक्षिततेचा कोणालाही फायदा होणार नाही. (Taliban)
सरकार अस्थिर करू नका, तालिबानचा अमेरिकेला इशारा
Taliban Warn USA Afghanistan GovernmentDainik Gomantak

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) तालिबान सरकारचे (Taliban Government) परराष्ट्र मंत्री अमीर खान मुतकी (Amir Khan Muttaqi) यांनी अमेरिकेला (USA) कडक इशारा दिला आहे की,तालिबान सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नका. दोहा (Doha) येथील दोघांच्या प्रतिनिधींच्या समोरासमोर झालेल्या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना मुताकी म्हणाले की, यासंदर्भात अमेरिकेला अगदी स्पष्ट शब्दात सांगितले गेले आहे. मुताकी असेही म्हणाले की तालिबानशी चांगले संबंध प्रत्येकासाठी फायदेशीर आहेत. कोणीही अफगाणिस्तान सरकारला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये.(Taliban Warn USA Afghanistan Government)

मुताकी यांच्या मते, त्यांनी या बैठकीत अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे की, अफगाणिस्तानची अस्थिरता आणि तिथल्या असुरक्षिततेचा कोणालाही फायदा होणार नाही. यामुळे फक्त लोकांना त्रास होईल. कतारची राजधानी येथे झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीनंतर मुताकीने अफगाणिस्तानच्या वृत्तसंस्था बख्तरशी संभाषणादरम्यान या गोष्टी स्प्ष्ट केल्या आहेत.

अमेरिका सोडल्यानंतर तालिबानशी त्यांची ही पहिलीच चर्चा होती. या बैठकीला अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपविशेष प्रतिनिधी टॉम वेस्ट आणि यूएसएआयडीच्या उच्च अधिकारी सारा चार्ल्स देखील उपस्थित होत्या.

Taliban Warn USA Afghanistan Government
Islamic State Issue: तालिबानचा अमेरिकेला धक्का

याच बैठकीत अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य घेतले जाणार नाही, असेही मुताकी यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि तालिबान यांच्यात ही चर्चा आजही सुरू राहील. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की तालिबान सरकारला सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत.

Related Stories

No stories found.