पंजशीरमध्ये तालिबान्यांनी केली 20 अफगाण नागरिकांची हत्या

मात्र पंजशीर (Panjshir) खोरे अहमूद मसूद (Ahmed Masood) आणि अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या नेतृत्वाखाली तालिबान्यांशी अजूनही लढा देत आहेत.
पंजशीरमध्ये तालिबान्यांनी केली 20 अफगाण नागरिकांची हत्या
TalibanDainik Gomantak

तालिबान्यांनी (Taliban) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी यांचे लोकशाही सरकार उलथवून लावत आपले सरकार अखेर स्थापन केले. मात्र पंजशीर (Panjshir) खोरे अहमूद मसूद (Ahmed Masood) आणि अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या नेतृत्वाखाली तालिबान्यांशी अजूनही लढा देत आहेत. आता पंजशीर खोऱ्यामध्ये तालिबान्यांनी किमान 20 अफगाण नागरिकांना मारले असल्याचे समजत आहे. ज्यामध्ये अतिरेकी आणि विरोधी दलांमध्ये जबरदस्त लढाई झाल्याचे पाहायला मिळत आहे, बीबीसीने यासंबधी माहिती दिली आहे. पंजशीरचं खोरं आपण ताब्यात घेतले असल्याचे तालिबान्यांनी दावा केला आहे. दुसरीकडे रेजिस्टन्स फोर्सचे म्हणणे आहे की, त्याच्याकडे अजूनही पंजशीर खोऱ्याचा 60 टक्के भाग घेतला असल्याचे म्हटले आहे. दरम्यान बीबीसीच्या एका अहवालातून स्पष्टपणे म्हटले आहे की, आता पंजशीरमध्ये अफगाण नागरिकांचे रक्त सांडत असून आत्तापर्यंत तब्बल 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Taliban
UNSC मध्ये अफगाणिस्तान ठरावावर मतदानासाठी चीन, रशियाची अनुपस्थित

दरम्यान, बीबीसीच्या अहवालानुसार, तालिबान्यांकडून लक्ष करण्यात आलेल्या 20 अफगाण नागरिकांमध्ये दुकानदाराचाही समावेश आहे. पंजशीरमधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर मागील दोन दिवसांपूर्वीच प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तालिबानी लढाखे अफगाण नागरिकांच्या घराबाहेर आणि रस्त्यावर गोळ्या झाडताना दिसत आहेत. अफगाणिस्तानमधील एका न्यूज पोर्टलनुसार म्हटले आहे की, हा युवक पंजशीरमधील उत्तर आघाडीच्या सैन्यामधील एक सदस्य होता. तथापी त्याचा आणखी एक साथीदार तालिबानला आपले ओळखपत्र दाखवत राहिला, मात्र तालिबान्यांनी त्याचा अखेर खात्मा केला.

Taliban
अशरफ घनींसोबत 'हा' क्रिकेटपटू सुद्धा अफगाणिस्तान सोडून पळाला

तालिबानी अफगाणिस्तानमध्ये रस्त्याच्या मधोमध अफगाण महिलांना मारत आहेत. मात्र दुसरीकडे तालिबानी नेत्यांकडून आपण बदलले असल्याचे लाखो दावे केले जात आहेत. ते अजूनही तेवढेच क्रूर असल्याचे अफगाण नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. राजधानी काबूलमध्ये तालिबान्यांनकडून एका निष्पाप अफगाण महिलेला मारहाण केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. मात्र दुसरीकडे तेवढ्याच तडफेने आफगाण महिला तालिबान्यांच्याविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com