'बुलडोजर' म्हणून प्रसिद्ध असलेले टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफूली यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांचं वयाच्या 61 व्या वर्षी निधन झालं आहे. टांझानियाचे उपाध्यक्ष सामिया सुलुहू यांनी अध्यक्ष मगुफुली यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांचं वयाच्या 61 व्या वर्षी निधन झालं आहे. टांझानियाचे उपाध्यक्ष सामिया सुलुहू यांनी अध्यक्ष मगुफुली यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. मगुफुली यांना कोरोनाची लागण झाल्याची  शक्यता वर्तविली जात आहे, परंतु अद्याप खात्री झाली नाही. मगुफुली कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसले नाही. अशा परिस्थितीत त्याच्या तब्येतीबद्दल बर्‍याच अफवा पसरल्या गेल्या आहे.

मगुफुली 1995 मध्ये संसदेचे हे खासदार म्हणून निवडले गेले होते. 2010 मध्ये त्यांनी टांझानियाच्या परिवहन मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. रस्ता बांधकाम उद्योगातील भ्रष्टाचाराविरोधात त्यांची तीव्र नेतृत्वशैली आणि लढा लोकांना प्रभावित करून गेला. त्याचबरोबर त्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामुळे त्यांचे नाव बुलडोजर असे पडले होते.

2020 मध्ये मगुफुली यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली

2015 मध्ये जॉन मगुफुली यांची प्रथमच अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर, 2020 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडून आले. टँझानियाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉन मगुफुली यांचे अभिनंदन केले होते.  दोन्ही देशांमधील मैत्री आणखी मजबूत करण्यास तयार आहेत. असे पीएम मोदी म्हणाले होते. मगुफुली यांनी दुसर्‍या पाच वर्षांच्या कार्यकासाठी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती.

निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात धांदल केल्याचा आरोप

या निवडणुकीत मगुफुली यांना 84 टक्के मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले होते. निवडणुकीच्या वेळी काही आव्हाने होती पण ही निवडणूक सुरक्षित आणि शांत पार पडली होती, असे मगुफुली यांनी एका निवेदनात म्हटले होते. अध्यक्षपदाची ही माझी दुसरी आणि शेवटची मुदत असेल. विरोधी पक्षांनी 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत पुन्हा मोठ्या प्रमाणात निवडणुकीत धांदल उडवल्याचा आरोप करत पुन्हा निवडणुकांची मागणी केली होती.

संबंधित बातम्या