फ्रान्समधील शिक्षकाचा शिरच्छेद ही इस्लामिक दहशतवादाची घटना - इमॅन्युएल मॅक्रॉन

गोमंतक वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

१७ ऑक्टोबरला​ पॅरिसमधील एका उपनगराच्या रस्त्यावर इतिहास शिक्षकाची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. संशयित हल्लेखोरला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. फ्रान्समधील दहशतवादाची ही दुसरी घटना आहे.फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेला “इस्लामी दहशतवादी हल्ला” असे संबोधले आहे.

 पॅरीस : १७ ऑक्टोबरला पॅरिसमधील एका उपनगराच्या रस्त्यावर इतिहास शिक्षकाची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. संशयित हल्लेखोरला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. फ्रान्समधील दहशतवादाची ही दुसरी घटना आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या घटनेला “इस्लामी दहशतवादी हल्ला” असे संबोधून, देशाला या कट्टरतावादाविरोधात एकजूटीने उभे राहण्याचे आवाहन केले. शिक्षकाने त्याच्या वर्गात इस्लामचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रांवर चर्चा केली होती, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

फ्रान्सच्या दहशतवादविरोधी पथकाने संशयिताने दहशतवादी हेतूने खून केला असल्याचे संकेत मिळत असल्याने, त्या दिशेने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद प्रकरणातील संशयितांचे कुटुंब, मित्र शोधण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असल्याचे फ्रान्सच्या दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी जीन-फ्रँकोइस रिकार्ड यांनी सांगितले.

१० दिवसांपूर्वी इस्लामचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रांवर चर्चा केल्याप्रकरणी या शिक्षकास धमकावण्यात आले होते. एका विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाविरूद्ध तक्रार देखील दाखल केली होती.

संबंधित बातम्या