नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला जीवे मारण्याची धमकी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

पाकिस्तानची नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला पुन्हा एखदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

इस्लामबाद : पाकिस्तानची नोबेल विजेत्या मलाला युसुफझाईला पुन्हा एखदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नऊ वर्षापूर्वी मलाला युसुफझाईला गोळ्या घालून जखमी करण्यात आले होते. आता पुन्हा एखदा तिच्यावर हल्ला करण्याची धमकी एहसानुल्ला एहसान या तेहरिक- तालिबानचा सदस्य असलेल्या दहशवाद्याने ट्वीट करुन दिली आहे. पुढच्यावेळी कोणत्याही प्रकारची चूक होणार नसल्याचा इशाराही यावेळी त्याने दिला आहे. मात्र ट्वीटरने लगेच त्याच्यावर कारवाई करत त्याचे ट्वीटर आकाउंट बंद केले आहे.

मलाला युसुफझाईने यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना ट्वीट करुन तेहरिक- तालिबानचा दहशतवादी एहसानुल्ला एहसान हा तुरुंगातून सुटला कसा असा प्रश्न विचारला आहे. एहसाननुल्ला यापूर्वी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या तुरुंगातून पळून गेला होता. त्याने त्यानंतर पाकिस्तानमधील पत्रकारांशी संवाद सुध्दा साधला होता.

तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे सल्लागार राउफ हसन यांनी मलाला युसुफझाईला मिळालेल्या धमकीची चौकशी आम्ही करत आहोत. आम्ही ट्विटरला लगेच त्याचे ट्विटर आकाउंट निलंबीत करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.      
 

संबंधित बातम्या