पंतप्रधान मोदी आणि रशियन महासंघाच्या अध्यक्षांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा

 Telephone discussion between Prime Minister Modi and the President of the Russian Federation
Telephone discussion between Prime Minister Modi and the President of the Russian Federation

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि रशियाच्या घटना दुरुस्तीवरील मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुतीन यांचे अभिनंदन केले. 24 जून 2020 रोजी मॉस्को येथे आयोजित केलेल्या लष्करी संचलनात भारतीय पथकाचा सहभाग म्हणजे रशिया आणि भारताच्या जनतेमध्ये असलेल्या घनिष्ठ मैत्रीचे प्रतीक असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. कोविड-19 च्या जागतिक महामारीच्या नकारात्मक परिणामांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी नोंद घेतली आणि कोविड-19 पश्चात जगात निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि रशिया यांच्यातील अतिशय दृढ संबंध महत्त्वाचे असल्याबाबत सहमती व्यक्त केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबध आणि चर्चांचे सत्र पुढे कायम राखण्याबाबत आणि त्याचाच परिणाम म्हणून या वर्षाच्या अखेरीला भारतात द्विपक्षीय शिखर परिषदेच्या आयोजनाबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. या द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी अध्यक्ष पुतीन यांचे स्वागत करण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com