भारत चीन सीमेवर पुन्हा तणावाची स्थिती; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

भारत चीन सीमाविवाद लडाखमध्ये सुरु असताना सिक्कीमच्या नाकू-ला सेक्टरमध्ये भारत चीनच्या सैनिकांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिक्कीम: भारत चीन सीमाविवाद लडाखमध्ये सुरु असताना सिक्कीमच्या नाकू-ला सेक्टरमध्ये भारत चीनच्या सैनिकांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हिंसक झडपमध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना सिक्कीमच्या सीमेवर या दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्षरत परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेवरील या तणावामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणचे दोन्ही देशामधील तणावाची परिस्थिती कमी करण्यासाठी तब्बल 17 तासांची वरिष्ठ पातळीवर वार्तालाप झाला होता. मात्र हा वार्तालाप या संघर्षामुळे निष्फळ ठरला असा दिसत आहे. ANI ने सीमेवर तणाव निर्माण झाल्यासंबंधीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पूर्व लडाखमध्ये ताबारेषेवर तणाव असताना सिक्कीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. उत्तर सिक्कीममधील नाकूला सेक्टरमध्ये तीन दिवसांपूर्वी चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय सैनिकांनी चीनच्या सैनिकांचा हा कावा ओळखून त्यांचा ताबारेषेवरील प्रयत्न हानून पाडला. भारताचा पाकिस्तान सीमेवर विवाद सुरु असताना चीनने भारताला सिक्कीमच्या सीमेवर घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. उभय देशांच्या सैनिकांध्ये झालेल्या झटापटीत दोन्ही देशांच्या सैनिक या संघर्षात जखमी झाले आहेत.

मागील आठवड्यात उत्तर सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न  केला .मात्र भारतीय सैनिकांनी त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. भारतीय लष्कर सिक्कीमच्या प्रतिकूल परिस्थीतीही चीनच्या सैनिकांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी सक्षम आसल्याचे यावेळी दाखवून दिले.
 

नाकूला सेक्टरमध्ये तणावाची परिस्थिती कायमच आहे, पण आता तणावानंतर परिस्थीती काहीशी निवळली आहे. उभय देशांमध्ये चर्चेची नववी फेरी पार पडली मात्र या चर्चेनंतर सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये तणाव निर्माण झाला आसल्या कारणाने आणखी तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मागील वर्षी याच सिक्कीच्या नाकूला सेक्टरमध्ये भारत चीन सैनिकांमध्ये हिसंक झडप झाली होती. यावेळी दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र चर्चेनंतर उभय देशांमधील तणावाची परिस्थिती काही प्रमाणात कमी झाली होती. येणाऱ्या काळात या दोन देशामधील संघर्ष कमी होणार का,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

 

संबंधित बातम्या