भारत-चीन सीमेवर 'हॉट स्प्रिंग' वरुन पुन्हा तणाव, 13 व्या फेरीत यावर चर्चा होणार
भारत (India) आणि चीन (China) दोन्ही देशांकडे हॉट स्प्रिंग (Hot spring) फ्रिक्शनबाबत कोणतीही चर्चा झाली नसून यावर दोघांकडे कोणताही उपाय नाही.Dainik Gomantak

भारत-चीन सीमेवर 'हॉट स्प्रिंग' वरुन पुन्हा तणाव, 13 व्या फेरीत यावर चर्चा होणार

हॉट स्प्रिंग्स (Hot spring) हे चीनबरोबर (China) असणाऱ्या सध्याच्या वादाचे शेवटचे क्षेत्र आहे. ज्यावर दोन्ही देशांनी अद्याप करार केला नाही. एप्रिल 2020 मध्ये चीनने हे क्षेत्र यथास्थित बदलण्याचा प्रयत्न केला.

भारत (India) आणि चीन (China) यांतील सीमा विवादाला एक वर्षाहून अधिक काळ झाला तरी शमण्याचे नाव घेत नाही. पूर्व लडाखमधील (East Ladakh) सीमेवर अजूनही या दोन देशांत तणाव आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी चर्चेच्या अनेक फेऱ्या आयोजित केल्या आहेत. त्याचवेळी, भारत-चीनमध्ये सीमा 12 वी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही देशांकडे हॉट स्प्रिंग (Hot spring) फ्रिक्शनबाबत कोणतीही चर्चा झाली नसून यावर दोघांकडे कोणताही उपाय नाही.

भारत (India) आणि चीन (China) दोन्ही देशांकडे हॉट स्प्रिंग (Hot spring) फ्रिक्शनबाबत कोणतीही चर्चा झाली नसून यावर दोघांकडे कोणताही उपाय नाही.
'भारत-चीनशी मैत्री अत्यंत महत्त्वाची': नेपाळी परराष्ट्र मंत्री

बैठकीच्या 13 व्या फेरीत या विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे. तथापि, लवकर बैठकीसाठी दोन्ही बाजूंकडून एक करार झाला आहे. सीमा विवादावर या महिन्यात बैठक होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 12 जुलै रोजी दोन्ही देशांमध्ये 12 व्या फेरीची बैठक झाली होती. पांगोंग लेक (उत्तर आणि दक्षिण) गोगरा हाईट्स जवळचा वाद मोठ्या प्रमाणात झाला होता पण तो वाटाघाटीद्वारे सोडविला गेला.

भारत (India) आणि चीन (China) दोन्ही देशांकडे हॉट स्प्रिंग (Hot spring) फ्रिक्शनबाबत कोणतीही चर्चा झाली नसून यावर दोघांकडे कोणताही उपाय नाही.
लद्दाख संघर्षानंतर भारत चीन चर्चेसाठी पुन्हा एकत्र

हॉट स्प्रिंगबाबत दोन्ही देशांत अद्याप करार नाही

हॉट स्प्रिंग्स हे चीनबरोबर असणाऱ्या सध्याच्या वादाचे शेवटचे क्षेत्र आहे. ज्यावर दोन्ही देशांनी अद्याप करार केला नाही. एप्रिल 2020 मध्ये चीनने हे क्षेत्र यथास्थित बदलण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, डेपसांग मैदाने आणि डेमचोक हे देखील वादग्रस्त क्षेत्र आहेत. परंतु या प्रकरणावर नंतर चर्चा होणार होती कारण हा वाद 2020 पूर्वीचा आहे.

चीन पुन्हा लष्करी ताकद वाढवते

गेल्या वर्षी भारत आणि चीनने प्रत्येकी 50 हजार सैनिक उंच डोंगराळ भागात तैनात केले होते. पण चर्चेनंतर दोन्ही देशांनी सैनिकांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली. पण पुन्हा एकदाया भागात दोन्ही देशांनी लष्करी ताकद वाढविण्यास सुरुवात केली असल्याचे समोर येत आहे

Related Stories

No stories found.