Elon Musk
Elon MuskDainik Gomantak

एलन मस्कवर लैंगिक छळाचा आरोप, शांत राहण्यासाठी महिलेला दिली 2.5 दशलक्षाची ऑफर?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, एलन मस्क यांचा एक वादांचा इतिहास आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, एलन मस्क यांचा दीर्घकाळ वादांचा इतिहास आहे. एलन जितके त्याच्या संपत्तीसाठी ओळखले जातात तितकेच वाद त्यांच्या नावावरही आहेत. एनल मस्कचे नाव आता एका नव्या वादात सापडले आहे. यावेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. खासगी जेटच्या फ्लाइट अटेंडंटने हा आरोप केला आहे. एलनवर त्याच्या खाजगी विमानात एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. जेव्हा फ्लाइट अटेंडंटने याविरोधात आवाज उठवला तेव्हा तिला शांत करण्यासाठी मस्कची कंपनी स्पेस एक्सने तिला 250,000 डॉलर म्हणजे सुमारे 1.9 कोटी रुपये दिले होते. (Elon Musk Sexual Misconduct)

महिलेने सांगितले की, 2016 मध्ये ती एका खासगी जेटमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती. एकदा लंडनला जाताना मस्कने त्याचे पाय चुकीच्या पद्धतीने दाबले. इतकेच नाही तर महिलेच्या म्हणण्यानुसार, मस्कने तिला मसाज देण्यास सांगितले आणि त्या बदल्यात तिला घोडा भेट देण्याचा शब्द दिला. कारण त्या महिलेला घोडेस्वारीची आवड होती.

Elon Musk
Video: एलन मस्क यांच्या SpaceX ने रॉकेटसह 53 सॅटेलाइट केले लॉन्च

त्याच वेळी, महिलेच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, तिच्या मित्राने एकदा सांगितले की एलन मस्कने तिला एका खाजगी खोलीत मसाज देण्यास सांगितले होते. महिलेने कंपनीच्या वरिष्ठांवरही तिला मसाज करायला शिकण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर महिलेने एलनवर प्रायव्हेट पार्ट दाखवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे संतापलेल्या महिलेने याबाबत कंपनीकडे तक्रार केल्यानंतर तिला याप्रकरणी गप्प राहण्यासाठी 1.9 कोटी रुपये देण्यात आले होते.

आरोपावर मस्क काय म्हणाले?

या प्रकरणी मस्कची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना मेल पाठवला असता त्यांनी उत्तर दिले की, या कथेत अनेक गोष्टी आहेत ज्या सांगितल्या गेल्या नाहीत. मस्कने यासाठी वेळ मागितला. "जर मी लैंगिक शोषणासारख्या गोष्टींमध्ये गुंतलो असतो, तर माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत याआधी एकही केस का घडली नाही, असे म्हणत मस्कने या प्रकरणाला राजकीयदृष्ट्या प्रेरित हिट पीस असल्याचे म्हटले आहे.

Elon Musk
बायडेन दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर; लवकरच राष्ट्राध्यक्ष यून सोक-युल यांची भेट घेणार

एलन मस्क यांनी या प्रकरणावर दोन ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले- माझ्यावरील आरोपांना राजकारणाच्या नजरेतून पाहिले पाहिजे. हे त्यांचे घृणास्पद प्लेबुक आहे. पण चांगले भविष्य आणि तुमच्या भाषण स्वातंत्र्याच्या लढ्यापासून कोणीही माझे लक्ष विचलित करू शकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com