थायलंडच्या पंतप्रधानांनी पत्रकारांवर फवारले सॅनिटायझर; व्हिडिओ व्हायरल

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

मंत्रीमंडळातील रिक्त पदासाठी संभाव्य उमेदवारांच्या यादीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारलेले त्यांना आवडले नव्हते.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी बऱ्याचदा मध्येच पत्रकार परिषद सोडून जाणाऱ्या अनेक राजकीय नेत्य़ांना आपण पाहिले असेल. मात्र काही नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याएवजी विचित्र कृती करताना पाहिले आहे का? थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांनी अशीच काहीशी विचित्र कृती केली आहे. त्यांनी  जमलेल्या पत्रकारांकडे आपल्या जागेवरुन अचानक उठून येत पत्रकारांवर सॅनिटाझरची फवारणी केली. त्य़ावेळी जमलेले अनेकजण आश्चर्यचकित झाले. पंतप्रधान पत्रकांराच्या अवघड प्रश्नामुळे चिडले होते.

मंत्रीमंडळातील रिक्त पदासाठी संभाव्य उमेदवारांच्या यादीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारलेले त्यांना आवडले नव्हते. गेल्या  आठवड्यामध्ये झालेल्या त्यांच्या मंत्रीमंडळातील तीन मंत्र्यांना सात वर्षापूर्वी झालेल्या निषेधाच्या वेळी बंडखोरी केल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले होते. यावरुन पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले होते.

यामुळे कॅनडात झळकले पंतप्रधान मोदींचे होर्डिंग

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान प्रयुथ यांनी व्यासपीठावर उभे असताना पत्रकारांना विचारले, विचारण्यासाठी काही आहे का? मला काही माहिती नाही आणि मी ते पाहिले ही नाही. मात्र पंतप्रधानांना यासंबंधी माहिती असणे आवश्यक होते. त्य़ांचा यासंबंधीचा धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान प्रयुथ यांनी हातात सॅनिटायझरची लहान बाटली घेतली, पत्रकारांकडे सहजपणे चालत आले आणि स्वत:च्या चेहऱ्यावर रुमाल ठेवून पत्रकारांवर सॅनिटाझरची फवारणी केली. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अनेकांनी पाहिला. तर काहींनी रिट्विटही केला. नेटीझन्सनाही पंतप्रधानांची ही कृती पाहून आश्चर्य वाटले.

 

संबंधित बातम्या