‘’हीच आहे इम्रान खानची लायकी!’’

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

तुझ्या विधानावर एक मोठा एफ यू मिळायला हवा इम्रान.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतचं एका पाकिस्तान वृत्त वाहिनीशी बोलताना महिलांवर होणाऱ्या बलात्काराविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टिकेची झोड उटवली गेली. त्यासोबतच सोशल मिडियावर देखील त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेण्यात आला. आता माजी जगविख्यात टेनिसपटू मार्टीना नवरातिलोवा हिने परखडपणे इम्रान खान यांच्या विधानाचा समाचार घेतला. ‘’तुझ्या विधानावर एक मोठा एफ यू मिळायला हवा इम्रान. तुला याहून चांगलंच माहीत हे की, परंतु तुझी हीच लायकी आहे. इम्रान तुला लाज वाटायला हवी,’’ असं ट्विट करत मार्टीना नवरतिलोवाने हल्लाबोल केला.

एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यलयाकडून खान यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र त्यांच्या वक्तव्याचा जगभरातील नेटकऱ्यांनी तसेच काही सेलिब्रिटींनी चांगलाच समाचार घेतला आहे. इम्रान खान यांनी गेल्या आठवड्य़ामध्ये पाकिस्तानी वाहिनीवरच्या शोमध्ये ‘’महिलांवरील अत्याचाराविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महीलांवरील वाढते अत्याचार हे पाश्चात्य देशांकडून आलेल्या अश्लिलतेचा परिणाम आहे. मुस्लिस धर्मामध्ये शरीर झाकण्याची पध्दत आहे,’’ असं इम्रान खान म्हणाले होते. (Thats what Imran Khan deserves)

"महिलांच्या कपड्यांमुळेच होतात बलात्कार" पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं...

मात्र इम्रान खान यांच्या वक्तव्यावरुन इतर नेटकऱ्याप्रमाणे टेनिसपटू  मार्टीना नवारतिलोवा हिने देखील जबरदस्त टिका केली. याआगोदरही इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनला शहीद म्हणून वाद ओढवून घेतला होता. ‘’मी कधीही विसरु शकणार नाही आणि पाकिस्तानी नागरिकांनाही शरम वाटली होती जेव्हा अमेरिकने अबोटाबादमध्ये येऊन हल्ला केला होता, आणि ओसामा बिन लादेनला मारलं, त्याला शहीद केलं होतं,’’ असं इम्रान खान म्हणाले होते. 

 

संबंधित बातम्या