डोमिनिकन रिपब्लिकच्या राजदूताचे हैतीमध्ये अपहरण, बॉर्डर क्रॉसिंगवर घडली घटना

डोमिनिकन रिपब्लिकच्या राजदूताचे थेट शेजारच्या हैतीमधून अपहरण करण्यात आले आहे. (Dominican Republic diplomat abducted).
डोमिनिकन रिपब्लिकच्या राजदूताचे हैतीमध्ये अपहरण, बॉर्डर क्रॉसिंगवर घडली घटना
HaitiDainik Gomantak

रशिया आणि युक्रेन यांच्याच मागील दीड-दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. यातच आता डोमिनिकन रिपब्लिकच्या राजदूताचे थेट शेजारच्या हैतीमधून अपहरण करण्यात आले आहे. (Dominican Republic diplomat abducted). एल दिया या स्थानिक वृत्तपत्राने मंगळवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सरकारने (Government) सीमेवर लष्करी जवानांची संख्या वाढवली आहे. मात्र राजदूताच्या अपहरणावर अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सरकारने आठवड्याच्या शेवटी एक निवेदन जारी करत म्हटले होते की, हैतीची (Haiti) राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्स येथील देशाचे राजदूत कार्लोस गुइलेन टाटिस यांचे शुक्रवारी दिवसाढवळ्या अपहरण करण्यात आले, जेव्हा ते सीमा ओलांडत होते. (The ambassador of the Dominican Republic has been abducted in Haiti)

Haiti
उत्तर कोरियाने पुन्हा डागले अज्ञात लक्ष्यावर मिसाइल, दक्षिण कोरियाचा दावा

राजनयिक अधिकारी फारुक मिगुएल कॅस्टिलो यांच्या म्हणण्यानुसार, टाटिस यांचे हैतीच्या राजधानीच्या क्रॉइक्स-डेस-बुसेट्स जिल्ह्यातून अपहरण केले गेले असावे. हे ठिकाण मावझो गटाचा एक किल्ला आहे, ज्याने ऑक्टोबरमध्ये यूएस मिशनरी गटाच्या 17 सदस्यांचे अपहरण केले होते. या 17 पैकी बहुतेकांना डिसेंबरपर्यंत ओलीस ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजदूतांच्या दूरध्वनीवरुन हैतीच्या पोलिसांना काही पुरावे सादर केले होते, ज्यावरुन त्यांचे अपहरण झाल्याचे सूचित होते.

राष्ट्रपतींची घरातच हत्या झाली

डोमिनिकन रिपब्लिकच्या परराष्ट्र मंत्रालयाने या सगळ्या घटनाक्रमावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. हैती किती असुरक्षित आहे, याचा अंदाज तुम्ही यावरुन लावू शकता की, हैतीच्या राष्ट्राध्यक्षांचीही घरात घुसून हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोसे यांच्या हत्येनंतर येथील सरकार अराजकता आणि विभाजनाचा सामना करत आहे. देशात हिंसक टोळ्या सक्रीय होत आहेत. ते देशाच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वीही होत आहेत. त्याचबरोबर खंडणीसाठी लोकांचे अपहरण करण्यात येत आहे. या असुरक्षिततेमुळे आजूबाजूचे देशही चिंतेत आहेत.

अपहरण करा

हैतीमध्ये अपहरणाच्या आरोपातून कोणताही गट सुटलेला नाही. देशातील सामान्य नागरिकांशिवाय परदेशी आणि अगदी पोलिस अधिकाऱ्यांचेही अपहरण होत आहे. अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिस नि:संशयपणे आपले प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्याकडे अत्याधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान आणि इतर गोष्टींचा अभाव आहे. ज्यामुळे ते त्यांचे ध्येय पूर्ण करु शकत नाही. लोकांना सोडण्याच्या बदल्यात खंडणीची मागणी या टोळ्यांकडून केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.