ड्रॅगनची नवी चाल, चीनी बनावटीच्या कॉम्प्युटरला देणार प्रोत्साहन

चीन (China) सरकारने सरकारी एजन्सीज आणि राज्य उद्योगांना परदेशी ब्रँडचे कॉम्प्युटर वापरण्यास बंदी घातली आहे.
ड्रॅगनची नवी चाल, चीनी बनावटीच्या कॉम्प्युटरला देणार प्रोत्साहन
ChinaDainik Gomantak

चीन सरकारने सरकारी एजन्सीज आणि राज्य उद्योगांना परदेशी ब्रँडचे पर्सनल कॉम्प्युटर वापरण्यास बंदी घातली आहे. त्या जागी त्यांना चीनी बनावटीचे कॉम्प्युटर वापरण्यास सांगण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी परदेशी टेक्नोलॉजीचा प्रवेश बंद करणे हा या कारवाईमागचा हेतू आहे. सर्व एजन्सीज आणि उद्योगांना हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्यास सांगितले आहे. (The Chinese government has instructed its agencies and state industries to stop using all personal computers of foreign brands)

दरम्यान, अमेरिकन मीडिया संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयामुळे केवळ चीनच्या सरकारी कार्यालयांमध्ये वापरले जाणारे 50 दशलक्ष कॉम्प्युटर बदलले जातील. या वृत्तानुसार, चीन सरकारने परदेशी ब्रँडऐवजी देशी बनावटीचे कॉम्प्युटर वापरण्याचा निर्णय फार पूर्वीच बनवला होता. मात्र हे काम संथगतीने सुरु होते. आता मात्र अमेरिकेसोबतचा (America) वाढता संघर्ष पाहता चीन सरकारने ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन चिप्स, सर्व्हर आणि फोनवरील आपले अवलंबित्व किमान पातळीवर आणणे हे चीन (China) सरकारचे उद्दिष्ट आहे.

China
रशियाच्या मित्र देशाला ड्रॅगन देणार क्षेपणास्त्रे, काय आहे चीनची रणनिती?

एचपी आणि डेल

कॅनालिस या एजन्सीच्या मते, चीनमधील पर्सनल कॉम्प्युटरचे सर्वात लोकप्रिय ब्रँड एचपी आणि डेल टेक्नॉलॉजीज आहेत. त्यांच्या खालोखाल चीनी कंपनी लेनोवोचा क्रमांक लागतो. आता नवीन धोरणानुसार एचपी आणि डेल कम्प्युटर बदलले जातील. चीन हा पर्सनल कॉम्प्युटर (PC) चा प्रमुख निर्यातदार आहे. 2021 मध्ये त्याची निर्यात नऊ टक्क्यांनी वाढली होती. परंतु चीनमधून निर्यात होणाऱ्या कॉम्प्युटरमध्ये अमेरिकन कंपन्यांनी बनवलेल्या कॉम्प्युटरचं प्रमाण सर्वाधिक होतं. या कंपन्यांचे उत्पादन युनिट चीनमध्ये आहेत.

कॅनालिस विश्लेषक एम्मा शू यांनी लिहिले आहे - 'चीनच्या पीसी मार्केटमध्ये प्रचंड गोंधळ आहे. परंतु 2021 मध्ये नोंदवलेला वाढीचा दर इथल्या कंपन्यांसाठी उपलब्ध असलेल्या मोठ्या संधींवर प्रकाश टाकतो. सरकारमध्ये सुरक्षेची चिंता वाढत आहे. त्यामुळे स्थानिक ब्रँडचे कॉम्प्युटर वापरण्याकडे कल वाढला आहे. यामुळे एचपी आणि डेलसारख्या अमेरिकन कंपन्यांना अतिरिक्त स्पर्धेला सामोरं जावं लागत आहे.'

China
'ड्रॅगन' चा नवा विक्रम, एकाच वेळी 22 उपग्रह प्रक्षेपित केले प्रक्षेपित

इंटेल आणि एमएमडीवर विश्वास ठेवा!

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, चीन सरकारने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार, पीसी ब्रँड आणि सॉफ्टवेअरचा समावेश करण्यात आला आहे. परंतु इंटेल आणि एमएमडीसारख्या कंपन्यांची उत्पादने यातून वगळण्यात आली आहेत. या कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा पर्याय चीनकडे अद्याप उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

China
सोशल मीडियाभोवती 'विषारी ड्रॅगन'चा विळखा; आता सुरू केला फेक अकाउंटचा खेळ

युरेशियन टाइम्स या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधील स्वदेशी माहिती तंत्रज्ञान (IT) उत्पादने खरेदी करण्याच्या धोरणामुळे मायक्रोसॉफ्ट आणि एचपी सारख्या अमेरिकन कंपन्यांनी चीनच्या सरकारी मालकीच्या कंपन्यांसोबत संयुक्त उद्योग स्थापन करण्याचे धोरण स्वीकारले आहे, जेणेकरुन ते सरकार खरेदी करु शकतात. असे असूनही, लेनोवो, हुआवेई, आणि इन्स्पर या चिनी कंपन्यांना ताज्या सरकारी धोरणाचा लाभ मिळणार असल्याचे समजते. किंगसॉफ्ट आणि स्टँडर्ड सॉफ्टवेअरसारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील चिनी कंपन्या आता मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि अ‍ॅडोबसारख्या अमेरिकन कंपन्यांकडून बाजारपेठेतील मोठा हिस्सा बळकावण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.