Coup In Mali: मालीत सत्तापालटाचा प्रयत्न, सरकारने केले पाश्चिमात्य देशावर आरोप

माली (Mali) या आफ्रिकन देशात पुन्हा एकदा सत्तापालटाचा प्रयत्न झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
Coup In Mali: मालीत सत्तापालटाचा प्रयत्न, सरकारने केले पाश्चिमात्य देशावर आरोप
Colonel Asimi GoitaDainik Gomantak

माली या आफ्रिकन देशात पुन्हा एकदा सत्तापालटाचा प्रयत्न झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. माली सरकारने सोमवारी उशिरा सांगितले की, सुरक्षा दलांनी देशातील सत्तापालटाचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सत्तापालटाच्या प्रयत्नाला पाश्चात्य देशाचा पाठिंबा असल्याचा आरोप सरकारने केला. मात्र, त्यांनी या देशाचे नाव उघड केले नाही. मालीवर सध्या कर्नल असिमी गोईटा यांचे शासन आहे, जे स्वत: सत्तापालटानंतर अध्यक्ष झाले. 2020 आणि 2021 मध्ये त्यांनी सत्तापालट केले आणि नंतर या पश्चिम आफ्रिकन देशाचे अध्यक्ष बनले.

Colonel Asimi Goita
Mali: सालेहमध्ये माली लष्करांची मोठी कारवाई, 203 दहशतवाद्यांचा केला खात्मा

दरम्यान, ज्या देशावर सत्तापालटाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, त्या देशाचे नाव प्रेस रिलीजमध्ये दिलेले नाही. तथापि, गोइटा यांच्या राजवटीत मालीचे फ्रान्सशी संबंध बिघडले, त्यानंतर फ्रेंच सैन्याने देशातून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. माली ही पूर्वी फ्रान्सची (France) वसाहत होती, जिथे त्यांचे सैन्य नऊ वर्षांपासून इस्लामिक अतिरेक्यांशी लढत होते. सरकारचे (Government) प्रवक्ते कर्नल अब्दुलाये माइगा यांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या सैनिकांनी सत्तापालटाचा प्रयत्न केला त्यांना पाश्चात्य देशाचा पाठिंबा होता.

सुरक्षा दलांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला

निवेदनानुसार, माली प्रजासत्ताक सरकार राष्ट्रीय सुरक्षेवरील या हल्ल्याचा निषेध करते, ज्याचा उद्देश देश सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणणे हा होता. मिगा यांनी सरकारी टेलिव्हीजनवरुन सांगितले की, गेल्या बुधवारी सुरक्षा दलांनी बंडाचा प्रयत्न केला. एक दिवस आधी, सरकारी प्रवक्त्याने घोषित केले की, माली G-5 मधून माघार घेत आहे.

Colonel Asimi Goita
श्रीलंकेची आर्थिक स्थिती बिघडली; नागरिकांची चिंता वाढली

फ्रान्सशी मालीचे संबंध बिघडत चालले आहेत

मागील महिन्याच्या सुरुवातीला, मालीयन सरकारने रेडिओ इंटरनॅशनल आणि फ्रान्स 24 या फ्रेंच मीडिया संस्थांवर कायमची बंदी घातली होती. अधिकार्‍यांचा आरोप होता की, ही माध्यमे माली सैनिकांकडून लोकांना छळत असल्याच्या खोट्या बातम्या प्रसारीत करत होती. अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी (Islamic State) संबंधित हिंसाचाराने गेल्या आठ वर्षांपासून मालीला उद्ध्वस्त केले आहे. 2020 मध्ये सत्ता हाती घेणारे लष्करी सरकार हिंसाचार रोखण्यासाठी धडपडत आहे. गेल्या महिन्यात येथील तीन लष्करी तळांवर झालेल्या हल्ल्यात सहा सैनिक ठार झाले तर अधिकहून सैनिक जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com