'फसवणुकीच्या आधारावंर घटस्फोट मिळणार नाही'

केवळ जोडीदाराची फसवणूक झाल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येणार नाही, असे चीनमधील (China) न्यायालयाने म्हटले आहे.
China

China

Dainik Gomantak 

केवळ जोडीदाराची फसवणूक झाल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येणार नाही, असे चीनमधील न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे चीनमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. चीनच्या अधिकृत ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या (China) शानडोंग प्रांतातील न्यायालयाने घटस्फोटाचे असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय दिला आहे, ज्यामध्ये फसवणुकीच्या आधारे संबंध संपवण्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर लोकांनी म्हटले आहे की, जर दोघांना वेगळे व्हायचे असेल तर न्यायालयाला काय हरकत आहे.

दरम्यान, खरं तर सहवासाला फसवणूक मानता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की, सहवास म्हणजे विवाहित व्यक्ती लग्न न करता कोणासोबतही राहू शकतात. घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज दाखल करण्याचे कारण म्हणून व्यभिचाराला मान्यता देण्यात येणार नसल्याचे न्यायालयाने कथितरित्या म्हटले आहे. या निर्णयामुळे चीनमध्ये खळबळ उडाली आहे. देशाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर लोकांनी ट्रेंड सुरु केला आहे, 'फसवणुकीमुळे घटस्फोटासाठी अर्ज नाही.' Weibo हे चीनचे ट्विटर मानले जाते.

<div class="paragraphs"><p>China</p></div>
इम्रान खानने 'या' शब्दात सुनावले मोदी सरकारला

घटस्फोट कायद्याबाबत चीनमध्येही गदारोळ सुरु

गेल्या वर्षी चीनने घटस्फोटाचा कायदा केला होता. या कायद्यामुळे पती-पत्नीला घटस्फोट घेणे कठीण झाले, कारण नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार जोडप्यांना महिनाभर 'कूलिंग ऑफ' कालावधीत राहावे लागेल. ते पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले. यामागचा हेतू असा होता की, जर जोडप्याला घटस्फोट घ्यायचा नसेल तर त्यांना पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात करण्यासाठी वेळ मिळेल. मात्र, त्यानंतरही ते घटस्फोटासाठी पुन्हा अर्ज करु शकतात, असही या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जोडप्यांना भीती होती की, या कायद्यामुळे घटस्फोटाची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होईल कारण जर एखाद्या जोडीदाराने घटस्फोट घेण्याच्या प्रक्रियेतून 30 दिवस आधी माघार घेतली तर अर्ज रद्द केला जाईल असे मानण्यात येईल. त्याच वेळी, पीडित पक्षाला पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज करावा लागेल, ज्यामुळे प्रक्रिया लांबेल आणि वकीलांना दीर्घकाळ गुंतवून खटला लढणे महाग होईल.

चीनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले

सरकारने हा कायदा मंजूर केल्यानंतर नागरिकांनी आपल्या वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ करत असल्याची टीका केली. अहवालानुसार, सन 2000 मध्ये चीनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण प्रति 1,000 लोकांमागे 0.96 इतके होते. पण 2019 मध्ये ते 3.36 पर्यंत वाढले. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाच्या नोंदीनुसार 2019 मध्ये 40 लाखांहून अधिक लोकांनी घटस्फोट घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com