काबूल ब्लास्टनंतर मृतदेहावर उभा मुलगा होता रडत; कुटुंबियांची झाली भेट

कित्येक दिवस कतारमध्ये (Qatar) एकटा राहिल्यानंतर तो टोरंटोमध्ये त्याच्या पालकांना अखेर भेटला.
काबूल ब्लास्टनंतर मृतदेहावर उभा मुलगा होता रडत; कुटुंबियांची झाली भेट
FamilyDainik Gomantak

दोन आठवड्यांपूर्वी काबूल विमानतळावर (Kabul Airport) झालेल्या स्फोटानंतरचे (Blast) दृश्य काळजाचा थरकाप उडवून देणारे होते. जिथे तीन वर्षांचा मुलगा मृतदेहांच्या मध्ये उभा राहून रडत होता. त्यावेळी गर्दीच्या रेट्यामुळे तो कुटुंबापासून (Family) विभक्त झाला. आता दोन आठवड्यांनंतर तो चिमुकला कॅनडातील (Canda) त्याच्या कुटुंबीयांना अखेर भेटला आहे. कित्येक दिवस कतारमध्ये (Qatar) एकटा राहिल्यानंतर तो टोरंटोमध्ये त्याच्या पालकांना अखेर भेटला.

कतार अनाथाश्रमात दोन आठवडे राहिले

कॅनडियन वृत्तपत्र 'ग्लोब अँड मेल' च्या बातमीनुसार, अली (नाव बदलले आहे) राजधानी काबूलमधून इतर निर्वासितांसोबत विमानाने कतारला गेला. यानंतर त्याला कतारची राजधानी दोहा येथे नेण्यात आले. तो सुमारे दोन आठवडे एका अनाथाश्रमात एकटाच राहिला, जिथून त्याला कॅनडात (Canada) राहत असलेल्या पालकांची भेट घालून दिली. काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 169 अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले.

Family
माजी उपराष्ट्रपतींचा आलिशान 'काबूल वाडा' आता तालिबानच्या हातात

17 वर्षाच्या मुलाने धैर्य दाखवले

दोहामध्ये अलीची काळजी घेणाऱ्याबद्दल कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 17 वर्षांच्या मुलाने काबूल विमानतळावरील उडालेल्या गोंधळामध्ये धैर्य दाखवत त्या लहान चिमुकल्याला सुरक्षित ठिकाणी नेले. अली आमच्यासाठी खास पाहुणा होता. कॅनेडियन दूतावासाशी बोलत असताना, आम्ही त्याच्या वडिलांचा शोध घेतला आणि त्यांची भेट घालून दिली. अलीने सुमारे 14 तासांचा दोहा ते टोरोंटो प्रवास केला. अलीला त्याच्या वडिलांनी गेल्या दोन वर्षांपासून पाहिले नव्हते, कारण त्याचे वडिल दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून कॅनडाला आले आणि तेथे सध्या ते ड्रायफ्रूटचा व्यवसाय करत आहेत. अलीला मिठी मारल्यानंतर शरीफ यांचे अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले की, मला दोन आठवडे झोप लागली नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com