Sri Lanka Violence: आंदोलक आक्रमक, खासदाराने स्वतःवर झाडली गोळी

श्रीलंकेत (Sri Lanka) सोमवारी झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत.
Sri Lanka Violence: आंदोलक आक्रमक, खासदाराने स्वतःवर झाडली गोळी
Sri Lanka ViolenceDainik Gomantak

Sri Lanka Violence: श्रीलंकेत सोमवारी झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. आर्थिक संकटानंतर, सरकारविरोधी निदर्शक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, ज्यामुळे सरकार समर्थक आणि आंदोलकांमध्ये पुन्हा संघर्ष झाला. (The MP shot himself during the violence in Sri Lanka)

दरम्यान, संघर्ष वाढत असताना, 22 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू (Curfew) लागू करण्यात आला आणि हिंसाचार थांबवण्यासाठी लष्कराला (Army) पाचारण करावे लागले. परंतु 9 एप्रिलपासून शांततेत निदर्शने करत असलेल्या आंदोलकांचा आता संपूर्ण श्रीलंकेत (Sri Lanka) रोष निर्माण झाला आहे.

Sri Lanka Violence
Sri lanka Economic Crisis: नेत्यांच्या घरांवर हल्ले, एका खासदारासह 5 जण ठार

त्याचवेळी श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हेलिकॉप्टरमधून नौदल तळावर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची प्रत्यक्ष माहिती असलेल्या लोकांनी माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली. सोमवारी राजपक्षे यांच्या निवासस्थानी हिंसाचार झाला होता.

Sri Lanka Violence
Sri Lanka Crisis: हिंसक संघर्षात खासदाराचा मृत्यू, अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू

तसेच, सोमवारी कोलंबोमध्ये, सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकिर्थी अथुकोराला यांनी त्यांच्या वाहनाचा मार्ग रोखणाऱ्या निदर्शकांवर गोळीबार केला, ज्यात एक 27 वर्षीय मुलगा ठार झाला आणि दोन जण जखमी झाले. त्यानंतर खासदाराने स्वतःला गोळी मारुन घेतली, असे पोलिसांनी सांगितले. खासदाराचा अंगरक्षकही मारला गेला. परंतु हे कसे झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजपक्षे यांच्या मूळ गावी मेदा मुलानामध्ये जमावाने वादग्रस्त राजपक्षे संग्रहालयावर हल्ला केला. हे संग्रहालय बनवण्यासाठी अर्धा दशलक्ष डॉलर्स खर्च झाले, त्यावर सरकारी पैसा खर्च होत असल्याबाबत न्यायालयात (Court) खटला सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.