Sri Lanka: इस्टर स्फोटानंतर मुस्लिम समुदाय बनला होता 'खलनायक', आता...'

श्रीलंकेत (Sri Lanka) सध्या आर्थिक अनागोंदी माजली आहे.
Muslim Community
Muslim CommunityDainik Gomantak

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत सध्या आर्थिक अनागोंदी माजली आहे. देशात मोठ्याप्रमाणात महागाईचा भडका उडाला आहे. यातच दुसरीकडे, इस्टरच्या मुहुर्तावर 21 एप्रिल 2019 रोजी झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटाने श्रीलंका हादरले होते. या हल्ल्यासाठी इस्लामिक अतिरेक्यांना जबाबदार धरण्यात आले, परंतु देशातील 10 टक्के मुस्लिम लोकसंख्येला याचा फटका बसला होता. त्यांच्यावर अनेक प्रकारची निर्बंध लादण्यात आली, एकप्रकारे ते अलिप्त राहिले, परंतु सध्यस्थितीतील श्रीलंकेच्या (Sri Lanka) आर्थिक स्थितीने त्यांना देशातील इतर समुदायांशी पुन्हा एकदा एकरुप केले आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मुस्लिम (Muslim) जनतेला संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळत आहे. (The Muslim community in Sri Lanka is challenging the economic situation by uniting with other communities in the country)

दरम्यान, सध्या कोलंबोच्या (Colombo) कोचिकोडे भागातील सेंट अँथनी चर्चच्या बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. इस्टरच्या दिवशी डच राजवटीत बांधलेले हे विशाल कॅथलिक चर्च आहे. जिथे प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असते. तीन वर्षांपूर्वी इस्टरच्या निमित्ताने श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्येही या चर्चला लक्ष्य करण्यात आले होते. इथे 93 लोक मारले गेले तर शेकडो जखमी झाले होते. या हल्ल्यांमध्ये एकूण 269 लोक मारले गेले आणि 500 हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यांसाठी इस्लामिक दहशतवाद्यांना जबाबदार धरण्यात आले होते. श्रीलंका सरकारने इस्लामी गट आणि संघटनांवर कारवाईही केली. शेकडो मदरसे बंद करण्यात आले होते. मुस्लिम महिलांना हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली होती. या हल्ल्यानंतर देशाची वांशिक आधारावर विभागणीही झाली. श्रीलंकेच्या लोकसंख्येच्या सुमारे दहा टक्के मुस्लिम, एकटे पडले होते.

Muslim Community
Sri Lanka Crisis: श्रीलंकेच्या मदतीला धावला भारत, 24 तासांत पाठवले 76 हजार टन इंधन

तसेच, श्रीलंकेतील गंभीर आर्थिक संकटाने मुस्लिमांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यांनाही पाठिंबा मिळत आहे. राजधानी कोलंबोच्या गल्फेस परिसरात सुरु असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिमांचाही सहभाग आहे. रमजानचा महिना असल्याने ते इथे सेहरी आणि इफ्तारी करतात.

Muslim Community
Sri Lanka Crisis: श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासह इतर देशातील दूतावास केले बंद

राजपक्षे सरकारवर मुस्लिम अधिक नाराज

आलिया हिजाब परिधान करुन मुलांसोबत आली आहे. हे लोक आंदोलनस्थळीच इफ्तारी करतात. "मुस्लिम महिला हिजाब (Hijab) परिधान करुन राजपक्षे सरकारचा निषेध करत आहेत. इथे आता कोणालाच त्याचा त्रास नाही," असं आलिया म्हणते. श्रीलंकेतील मुस्लिम विशेषतः राजपक्षे सरकारवर नाराज आहेत. ईस्टर हल्ल्यानंतर कटाच्या मुळाशी जाण्याऐवजी संपूर्ण मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आले, असे त्यांना आता वाटते. आता तेही सद्यस्थितीकडे सरकारपासून मुक्त होण्याची संधी म्हणून पाहत आहेत. अफजल हुसेन हा विद्यार्थी असून तो निषेधाच्या ठिकाणी इफ्तार समन्वयक आहे. संध्याकाळपर्यंत आंदोलनस्थळी इफ्तारीची तयारी सुरु होते. मोठ्या संख्येने लोक एकत्र इफ्तारी करतात. यामध्ये उपवास करणाऱ्या मुस्लिमांव्यतिरिक्त इतरही लोक आंदोलनात सहभागी आहेत.

भारत, कॅनडा, लंडन येथूनही मदत मिळत आहे

अफझल म्हणतो, "इस्टर हल्ल्यानंतर लोक धर्म आणि समुदायांमध्ये विभागले गेले होते. खूप फरक होता, पण सध्याच्या परिस्थितीने सर्वांना एकत्र आणले आहे. आम्ही सगळे इथे एकत्र आहोत."

Muslim Community
Sri Lanka Crisis: भारत आपले सैन्य श्रीलंकेत पाठवणार नाही: उच्चायुक्त

तो पुढे म्हणाले, "या आंदोलनामागे खाजगी आणि सरकारी कॉलेज कॅम्पसमधील विद्यार्थीही आहेत. आम्ही इथे इफ्तारची व्यवस्था करतो. श्रीलंकेशिवाय आम्हाला इतर देशांतूनही मदत मिळत आहे. भारत, कॅनडा आणि लंडनसारख्या ठिकाणांहून लोक आमच्याकडे येतात. मदत पाठवत आहे."

अफझल पुढे म्हणाला, "सरकारकडून आम्हाला नेमकं काय हवं ते पाहिलं पाहिजे. कोणत्याही धर्माला एकटेपणाने पाहिले जाऊ नये."

Muslim Community
श्रीलंकेत नवीन मंत्रिमंडळाची स्थापना

फरहा ही विद्यार्थिनी असून हिजाब परिधान करुन या आंदोलनात सहभागी झाली आहे. इस्टर हल्ल्यानंतर, फराह आणि तिच्यासारख्या अनेक मुस्लिम मुलींनी हिजाब घालणे बंद केले आणि त्यांचा पारंपारिक पोशाख बदलला, परंतु फराहने आता पुन्हा हिजाब परिधान केला आहे. आता आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही.

फरहा म्हणाली, "सध्या इथे वर्णद्वेष नाही, सर्वजण एकत्र आहेत, पण इस्टर हल्ल्यानंतर संपूर्ण मुस्लिम समुदायाला जबाबदार धरण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com