रहस्यमयी 'व्हायरल फिव्हर'ने पाकिस्तानची उडवली झोप, डॉक्टरही अचंबित !

पाकिस्तानमधील (Pakistan) कराची (Karachi) शहरात रहस्यमयी व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. जो डेंग्यूच्या तापासारखेच असल्याचे मानले जात आहे.
रहस्यमयी 'व्हायरल फिव्हर'ने पाकिस्तानची उडवली झोप, डॉक्टरही अचंबित !
Viral FeverDainik Gomantak

पाकिस्तानमधील (Pakistan) कराची (Karachi) शहरात रहस्यमयी व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. जो डेंग्यूच्या तापासारखेच असल्याचे मानले जात आहे. यामध्ये रुग्णाच्या प्लेटलेट्स आणि पांढऱ्या रक्त पेशी (White Blood Cells) कमी होत आहेत. स्थानिक माध्यमांनी तज्ञांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र न्यूज इंटरनॅशनलने डॉक्टर आणि पॅथॉलॉजिस्टचा हवाला देत म्हटले की, जेव्हा या विषाणूजन्य तापाची डेंग्यूसाठी चाचणी केली जाते तेव्हा त्याचा परिणाम नकारात्मक येत आहे.

डाऊ युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, कराची येथील मॉलेक्युलर पॅथॉलॉजीचे अध्यक्ष प्रोफेसर सईद खान यांनी म्हटले की, “गेल्या काही आठवड्यांपासून आपण विषाणूजन्य तापाची प्रकरणे मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहोत. ज्यामध्ये प्लेटलेट्स आणि पांढऱ्या रक्त पेशी कमी होत आहेत. बाकीची लक्षणे देखील डेंग्यू तापासारखी असतात (Dengue Fever Symptoms). परंतु जेव्हा आम्ही या रुग्णांची NS1 प्रतिजन (Dengue Testing) चाचणी केली तेव्हा त्यांचा अहवाल निगेटिव्ह येतो. शहरातील विविध रुग्णालयातील डॉक्टर आणि हिमॅटो-पॅथॉलॉजिस्टसह इतर तज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे.

Viral Fever
कोरोना आला परत, चीनमध्ये 'या' शहरातील शॉपिंग मॉल केले सील

गूढ विषाणूजन्य ताप हा डेंग्यू नाही

कराचीमध्ये डेंग्यूसारखा संसर्ग पसरत असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. हा डेंग्यू तापासारखा आजार असून त्यातही रुग्णाला डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणे ट्रीटमेंट दिली जात आहे, परंतु हा डेंग्यूमुळे येणारा ताप नाही. गुलशन-ए-इकबाल शहरातील एका रुग्णालयातील आण्विक शास्त्रज्ञ डॉ. मुहम्मद जोहेब यांनीही या विषाणूजन्य तापाची (Pakistan Mysterious Viral Fever) पुष्टी केली आहे. ते पुढे म्हणाले, 'या गूढ विषाणूजन्य आजाराबरोबरच डेंग्यू तापाचे रुग्णही वाढत आहेत, त्यामुळे शहरात मेगा युनिट प्लेटलेट्स तसेच दुसऱ्या युनिटची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मेगा युनिट आणि रॅंडम प्लेटलेट्स युनिटसाठी घरोघरी भटकत आहेत.

इस्लामाबादमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले

तसेच, दुसऱ्या मीडिया रिपोर्टमध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या (DHO) हवाल्याने म्हटले आहे की, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये डेंग्यूच्या 45 रुग्णांची नोंद झाली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या मते, यावेळी संघीय राजधानीत (Dengue Cases in Pakistan) डासांच्या चाव्याव्दारे एकूण 4,292 रुग्ण आढळून आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते (WHO) डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे, जो सहसा उष्ण हवामानात पसरतो आणि पावसाळ्यात त्याचे प्रमाण जास्त असते.

Related Stories

No stories found.