'धाडमधुम', डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची दुरवस्था

पाकिस्तानी रुपयाची किंमत डॉलरच्या (Dollars) तुलनेत खूपच कमी झाली आहे.
'धाडमधुम', डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची दुरवस्था
Pakistani Rupee Dainik Gomantak

पाकिस्तानी रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे. इंटरबॅंक मार्केटमध्ये रुपया आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सुरुवातीच्या व्यापारात पाकिस्तानी चलनाची किंमत 82 पैशांनी वाढली होती. परंतु सध्या इंटरबॅंक मार्केटमध्ये 188.35 रुपयांवर व्यवहार होत आहेत. जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. (The Pakistani rupee has hit an all-time low against the dollar)

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. फॉरेक्स डीलर्सच्या मते, स्थानिक चलनाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने विनिमय दरात मोठी तफावत जाणवत आहे. विदेशी मुद्रा वितरकांनी सांगितले की, पाकिस्तानी नोटा खुल्या बाजारात 189 रुपयांपेक्षा जास्त विकल्या जात आहेत.

Pakistani Rupee
नेपाळची सेती जलविद्युत प्रकल्पासाठी भारताशी चर्चा सुरू

दरम्यान, दुसऱ्या दिवशी इंटरबॅंकमध्ये पाकिस्तानी रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 187.53 रुपये होती. तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या वाढीमुळे रुपयावर आधारित अर्थव्यवस्था (Economy) आणि भागधारकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचा (SBP) परकीय चलन साठा या आठवड्याच्या अखेरीस $328 दशलक्ष वरुन 23 एप्रिलपर्यंत $10.558 वर आला आहे. केंद्रीय बँकेने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

Pakistani Rupee
''पाकिस्तान कर्जात बुडाला'': पंतप्रधान शाहबाज शरीफ

पाकिस्तानी रुपयाची आहेत?

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आयएमएफकडून मिळणाऱ्या निधीत होणारा विलंब, मित्र देशांकडून तत्काळ आर्थिक मदत न मिळणे, परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होणे आणि वाढती व्यापार तूट यामुळे देशांतर्गत चलनावर दबाव येत असल्याचे चलन वितरकांचे म्हणणे आहे. नवीन सरकार इंधन आणि विजेवरील सबसिडी काढून टाकण्याचे टाळत आहे. जी IMF कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याची पूर्व अट देखील आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही कमी होत आहे.

परकीय चलन साठा कमी होत आहे

परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्याने पाकिस्तानी गुंतवणूकदार चिंतेत आहेत. रेमिटन्स आणि निर्यातीद्वारे येणारा पैसा बाजारातील मागणी पूर्ण करण्यात कमी पडत आहे. यासोबतच विदेशी कर्जाचा बोजा वाढत असून आयातही वाढत आहे. त्यामुळे रुपयावरही दबाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानला (Pakistan) मदत करणारे सौदी अरेबिया (Saudi Arabia), यूएई आणि चीनही आता आर्थिक मदत करण्यात विलंब करत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी केल्यानंतर होत असलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय पारा चढत आहे. नव्याने निवडणुका घेण्याची मागणीही इम्रान खान करत आहेत. 20 मे रोजी इस्लामाबादमध्ये आपल्या समर्थकांसह मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.