37 हजार फूटांवर असताना झाला विमानाच्या इंजिनात बिघाड, केली इमर्जन्सी लॅडींग!

37000 फूटांच्या उंचीवर विमानाचे इंजिन बिघडल्याने, अमेरिकेला जाणारे विमान डब्लिनमध्ये लँडिंग करण्यात आले.
37 हजार फूटांवर असताना झाला विमानाच्या इंजिनात बिघाड, केली इमर्जन्सी लॅडींग!
Plane Dainik Gomantak

अमेरिकेला जाणाऱ्या विमानाला डब्लिनमध्ये अचानक आपत्कालीन लँडिंग (Plane Emergency Landing) करावे लागले, शनिवारी रात्री 12 प्रवासी युरोपमध्ये (Emergency Landing Europe) अडकून पडले. विमानाच्या इंजिनमध्ये मध्यभागी बिघाड झाला असल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. एव्हिएशन मीडिया आणि ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, ब्रुसेल्स एअरलाइन्सचे फ्लाइट 102 शुक्रवारी ब्रसेल्सहून न्यूयॉर्कला जात असताना वैमानिकांनी 'पैन-पैन' संदेश जारी केला. याचा अर्थ असा की समस्येबद्दल (Plane) सुचीत करणे, ज्याचे निराकरण केले जाऊ शकते.

विमान 37,000 फूट उंचीवरून पश्चिमेकडे उड्डाण करत असताना ही घटना घडली. 12 वर्षांचा अनुभव असणारे एअरबस A330-300 च्या वैमानिकांनी विमान पश्चिम आयर्लंडमधील शॅनन येथे वळवण्याची विनंती केली, परंतु एअरलाइनच्या सूचनेनुसार त्यांना डब्लिनमध्ये उतरावे लागले. ब्रुसेल्स एअरलाइन्सच्या लुफ्थांसा युनिटने याप्रकरणी काहीही सांगितले नाही. प्रवाशांनी वैमानिकांचे कौतुक केले पण ते घडलेल्या प्रकाराबद्दल संतप्त देखील आहेत.

Plane
'हा' आहे जगातील सर्वात विचित्र मासा

शनिवारी पॅरिसला जाण्यापूर्वी त्यांना डब्लिनमधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. थँक्सगिव्हिंग फेस्टिव्हलमुळे न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये गर्दी होत आहे, त्यामुळे अनेकांना विमानात चढता आले नाही. या लोकांमध्ये 18 वर्षीय माजा श्मिटो यांचा समावेश आहे. ती मूळची जर्मनीची असून काही कामानिमित्त न्यूयॉर्कला जात होती. त्यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला मोबाईलद्वारे सांगितले की, 'त्यांच्याकडे शाकाहारी जेवण नाही, त्यामुळे मला ब्रेड आणि बिस्किटे खावी लागतात.'

दुसरा 22 वर्षीय प्रवासी ऑलिव्हर समरबर्ग हा देखील जर्मनीचा आहे. तो दुसऱ्यांदा विमानात बसला आहे आणि यावेळी त्याचा अनुभव अजिबात चांगला नव्हता. समरबर्ग म्हणतो, 'मी अस्वस्थ होतो, काय होत होत ते समजत नव्हते. त्यांनी आम्हांला काहीही सांगितले नाही.' बेल्जियमचे न्यायिक अधिकारी बर्नार्ड विडिक यांनी सांगितले की त्यांना पॅरिसमधील कनेक्टिंग फ्लाइटमध्ये चढण्यास नकार देण्यात आला कारण डब्लिनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना घेऊन जाणारे विमान देखील उशिराने उड्डाण करत होते. तो म्हणाला, 'याचा अर्थ असा आहे की आपण पॅरिसमध्ये अडकलो आहोत, जिथे आम्ही न्यूयॉर्कमध्ये असायला हवे होते. आमच्याकडे असलेल्या काही सुट्ट्यांपैकी दोन दिवस आम्ही इथेच वाया घालवत आहोत. त्यामुळे प्रवास्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com