बगदाद विमानतळ कंपाऊंडवर रॉकेट हल्ला, अमेरिकेच्या एअरबेसलाही करण्यात आले लक्ष्य

इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Baghdad Airport) आणि त्याला लागून असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.
 Baghdad Airport
Baghdad AirportDainik Gomantak

इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि त्याला लागून असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. या रॉकेट हल्ल्यामुळे जवळच्या विमानाचे नुकसान झाले आहे. मात्र हे विमान वापरात नव्हते. याबाबतची माहिती इराकी पोलिस सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. यामध्ये जिवीतहानी झाली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितलेले नाही. या कंपाऊंडवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत. (The Rocket Attack On The Baghdad Airport Compound Also Targeted A US Airbase)

दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, खराब झालेले विमान इराकी एअरवेजचे होते, जे वापरात नव्हते. यूएस एअरबेस कॅम्पला व्हिक्टरी नावाने ओळखला जातो. विशेष म्हणजे हा कॅम्प बगदादच्या नागरी विमानतळाच्या भोवती स्थित आहे. गेल्या काही दिवसांपासून रॉकेट हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी अमेरिकन आणि काही इराकी अधिकारी इराण (Iran) समर्थित शिया मिलिशिया गटांना यासंबंधी दोष देतात. या ठिकाणी अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीला हे गट विरोध करत आहेत. अलिकडच्या वर्षांत, त्यांनी अनेकदा कॉम्प्लेक्सला लक्ष्य केले आहे.

 Baghdad Airport
Russia-Ukraine Conflict: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास भारतावर काय परिणाम होणार?

बगदादमधील अमेरिकन दूतावासावर तीन रॉकेट डागण्यात आले

यापूर्वी, दोन इराकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, 13 जानेवारीला बगदादच्या (Baghdad) अतिसुरक्षित भागात अमेरिकन दूतावासावर किमान तीन रॉकेट डागण्यात आले होते. यापैकी दोन रॉकेट दूतावासाजवळ आले, तर दुसरे रॉकेट जवळच्या निवासी संकुलात असलेल्या शाळेवर आदळले. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच इराकमधील अमेरिकेच्या उपस्थितीला लक्ष्य करुन ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरु आहे. इराणी जनरल कासिम सुलेमानी आणि इराकी मिलिशिया कमांडर अबू महदी अल-मुहांडिस यांचा समावेश आहे.

त्याचवेळी 5 जानेवारी रोजी अमेरिकन (America) लष्कराच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. त्याच्या जवळ रॉकेट हल्ला करण्यात आला. युती दलाच्या ऐन अल-असद हवाई सुविधेजवळ आलेले दोन ड्रोन पाडण्यात आले. ड्रोन हल्ल्यांनंतर आता रॉकेट हल्ला झाला आहे. ज्या अल-असाद हवाई तळावर हा हल्ला झाला, तो बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे. अल-असाद तळावरच अमेरिकन सैनिक उपस्थित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com