Afghanistan: तालिबान म्हणते...'मुलींना शिक्षण मिळण्याचा पूर्ण अधिकार'

तालिबानला (Taliban) जागतिक स्तरावर मान्यता मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
Afghanistan: तालिबान म्हणते...'मुलींना शिक्षण मिळण्याचा पूर्ण अधिकार'
AfghanistanDainik Gomantak

अफगाणिस्तानमधील अशरफ घनी यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी आपली राजवट पुन्हा स्थापन केली. या सत्ता स्थापनेमध्ये पाकिस्तान आणि चीन यांनी मदत तालिबानला मदत केली असल्याचा आरोप सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन करण्यात आला. मात्र पाकिस्तान (Pakistan) आणि चीनने (China) सातत्याने हे आरोप फेटाळले आहेत. यातच तालिबानला (Taliban) जागतिक स्तरावर मान्यता मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. (The Taliban Has Said That Girls Have Every Right To Education)

याच पाश्वभूमीवर जागितक मान्यता मिळविण्याच्या नादामध्ये तालिबानला जगाला जे दाखवायचे आहे तेच बदलायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा नव्याने मुलींची शाळा सुरु करण्याची गरज जबाबदारी आमच्यावर आहे मात्र ती जगाच्या दबावाखाली तसे करता येणार नाही. स्थानिक खामा प्रेसच्या मते, कार्यवाहक मंत्री मोली नूरउल्लाह मुनीर यांनी अफगाणिस्तानमधील (Afghanistan) संयुक्त राष्ट्र महासचिवांचे विशेष प्रतिनिधी डेबोरा लायन्स यांच्या भेटीदरम्यान या गोष्टी सांगितल्या.

Afghanistan
Afghanistan: सरकारी नोकऱ्यांमध्ये समान पदासाठी अफगाण महिला रस्त्यावर

मुनीर म्हणाले की, मुलींना शिक्षण मिळणे हा हक्क आहे. आणि तो हक्का बहाल करण्याची जबाबदारी तालिबान सरकारची आहे. मुला-मुलींसाठी सार्वजनिक विद्यापीठे मार्चपासून सुरु होणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षात (Girls University Afghanistan) पुन्हा सुरु केली जातील. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. तेव्हापासून मुलांसाठी आणि मुलींसाठी सुमारे 150 विद्यापीठे बंद केली. मुलींसाठी सर्व खाजगी हायस्कूल देखील बंद आहेत.

एकाच वर्गात शिकणार नाही

या महिन्याच्या सुरुवातीला तालिबानचे शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी म्हणाले की, ''देशभरातील मुला-मुलींसाठी सर्व विद्यापीठे पुन्हा सुरु केली जातील (मुली शिक्षण अफगाणिस्तान). परंतु मुला-मुलींचे वर्ग वेगळे असतील. म्हणजेच ते एकाच वर्गात एकत्र शिकू शकणार नाहीत.'' जरी त्यांनी ते उघडण्याची तारीख सांगितली नाही. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने अफगाणिस्तानला मानवतावादी मदत म्हणून $32 दशलक्ष दिले आहेत. ही मदत अफगाणिस्तान इंटरनॅशनल बँकेला (AIB) देण्यात आली.

Afghanistan
Afghanistan: महिलांना हिजाब घालणं झालं बंधनकारक, तालिबानने काढला फर्मान

UN AIB ला मदत करते

अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणते की, UN मदत देत असून आत्तापर्यंत $ 32 दशलक्ष रोख (अफगाणिस्तानला UN मदत) मिळाले आहेत. हे पैसे अफगाणिस्तान इंटरनॅशनल बँकेला (AIB) देण्यात आल्याचे बँकेने एका निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, आम्ही सर्व मानवतावादी प्रयत्नांचे स्वागत करतो. जे गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला आणि तेव्हापासून हा देश आर्थिक, मानवतावादी आणि सुरक्षा संकटाचा सामना करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.