Video: तालिबान्यांची मद्यविक्री विरोधात मोहीम, 3000 लिटर दारु जप्त करुन केली स्वाहा!

अफगाण गुप्तहेरांनी काबूलच्या (Kabul) कालव्यात 3000 लिटर दारु सांडून देण्यात आली. त्यासंबंधी व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे.
liquor

liquor

Dainik Gomantak 

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने देशात दारु विक्रीवर बंदी आणल्यानंतर त्याविरोधात मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत रविवारी अफगाण गुप्तहेरांनी काबूलच्या कालव्यात 3000 लिटर दारु सांडून देण्यात आली. त्यासंबंधी व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. जेणेकरुन अवैध दारु विक्रेत्यांना समजेल की, तालिबानी (Taliban) राजवटीमध्ये त्यांचं काही खरं नाही.

दरम्यान, हा व्हिडिओ गुप्तचर संचालनालयाने (GDI) जारी केला आहे. यामध्ये जीडीआयचे एजंट ड्रममध्ये भरलेली दारु गटारात टाकताना दिसत आहेत. काबूलमध्ये (Kabul) टाकलेल्या छाप्यांमध्ये ही दारु जप्त करण्यात आली होती. यावेळी पकडलेल्या दारु विक्रेत्यांना हातकड्या घालून जागीच संगीनच्या सावलीत उभे करण्यात आले.

<div class="paragraphs"><p>liquor</p></div>
तालिबानचा अफगाणिस्तान हत्यारांच्या ब्लॅक मार्केटवर अखेर पडदा

तसेच, गुप्तचर संस्थेने रविवारी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला. यासोबतच एका अफगाण गुप्तचर अधिकाऱ्याने इशारा दिला आहे की, मुस्लिमांना देशात दारु निर्मिती आणि पुरवठा करण्यापासून परावृत्त करावे लागेल.

शिवाय, तालिबान्यांनी ही दारु कधी जप्त केली आणि कधी नाल्यात फेकली हे अद्याप समजू शकलेले नाही. जीडीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारवाईदरम्यान तीन दारु विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.

पूर्वीच्या पाश्चिमात्य सरकारच्या काळात अफगाणिस्तानमध्ये दारुच्या सेवनावर आणि विक्रीवरही बंदी घालण्यात आली होती, परंतु तालिबान स्वतःला इस्लामचा कट्टर समर्थक मानतो, त्यामुळे त्याविरोधात कठोर भूमिका घेत आहे. 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर (Afghanistan) सत्ता काबीज केल्यानंतर इस्लामिक सरकारने मद्यविक्रीविरोधात देशव्यापी छापामारी मोहीम सुरु केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com