तालिबान 4 सप्टेंबरला करणार सरकार स्थापनेची घोषणा!

मुजाहिद पुढे म्हणाले की, नवीन सरकार (Taliban Government) स्थापनेची घोषणा आता शनिवारी केली जाईल.
तालिबान 4 सप्टेंबरला करणार सरकार स्थापनेची घोषणा!
Zabiullah MujahidDainik Gomantak

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान सरकार (Afghanistan Government) स्थापनेची तारीख आणखी एक दिवस पुढे ढकलली आहे. अतिरेकी संघटनेचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन अफगाणिस्तान सरकारच्या स्थापनेची घोषणा शुक्रवारी होणार होती. पण आता एक दिवस उशीर झाला आहे. मुजाहिद पुढे म्हणाले की, नवीन सरकार (Taliban Government) स्थापनेची घोषणा आता शनिवारी केली जाईल. सूत्रांनी सांगितले की, कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल गनी बरदार हे तालिबान सरकारचे प्रमुख असण्याची शक्यता आहे.

Zabiullah Mujahid
पंजशीरसमोर तालिबान हतबल, 40 मृतदेह सोडून काढला पळ

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून दोन आठवड्यांहून अधिक काळ झाला आहे. अशा स्थितीत कट्टरपंथी इस्लामिक गटाने आज सरकार स्थापनेची घोषणा करणे अपेक्षित होते. असे मानले जाते की, काबूलमध्ये (Kabul) इराणी नेतृत्वासारखी (Iranian leadership) राजवट असेल. यामध्ये तालिबानचा सर्वोच्च धार्मिक नेता मुल्ला हेबतुल्ला अखुंदजादा (Mullah Hebatullah Akhundzada) हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता असेल. तालिबानच्या माहिती आणि संस्कृती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी मुफ्ती इनामूल्ला सामंगानी म्हणाले की, नवीन सरकारवर चर्चा जवळजवळ संपली असून आणि मंत्रिमंडळावर आवश्यक चर्चाही झाली आहे.

सर्वोच्च, राजकीय, धार्मिक आणि लष्करी बाबींवर अंतिम अधिकार

इराणमध्ये, सर्वोच्च नेत्याकडे देशातील सर्वोच्च राजकीय आणि धार्मिक असतात. त्यांचा दर्जा राष्ट्रपतींपेक्षा जास्त आहे. सर्वोच्च नेते देशाचे सैन्य, सरकार आणि न्यायव्यवस्थेच्या प्रमुखांची नेमणूक करतात. देशाच्या राजकीय, धार्मिक आणि लष्करी बाबींमध्ये सर्वोच्च नेत्याला अंतिम अधिकार असतात. इनामूल्ला सामंगानी म्हणाले, मुल्ला अखुंदजादा सरकारचे नेते असतील आणि त्यावर प्रश्नच नाही. सांगानी यांनी संकेत दिले की, राष्ट्रपती त्यांच्या देखरेखीखाली काम करतील. मुल्ला अखुंदजादा हे तालिबानचे सर्वोच्च धार्मिक नेते असून ते 15 वर्षांपासून बलुचिस्तान प्रांतातील कचलाक भागातील एका मशिदीत सेवा करत आहेत.

Zabiullah Mujahid
अमेरिका-तालिबान यांच्यात पडद्यामागे शिजतेय 'खिचडी'; सीआयए प्रमुखांची गुप्त वार्ता

तालिबानने प्रांतांचे राज्यपाल, पोलीस प्रमुख आणि पोलीस कमांडर नियुक्त केले

इनामूल्ला सामंगानी म्हणाले, नवीन सरकारी रचनेत राज्यपाल प्रांतांचा कारभार सांभाळतील. त्याच वेळी, जिल्हा राज्यपाल त्यांच्या संबंधित जिल्ह्यांचा प्रभारी असतील. तालिबानने यापूर्वीच प्रांत आणि जिल्ह्यांसाठी राज्यपाल, पोलीस प्रमुख आणि पोलीस कमांडर नियुक्त केले आहेत. नवीन राजवटीचे नाव, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत अद्याप निश्चित झालेले नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, तालिबानने म्हटले आहे की, वेस्टर्न युनियन अफगाणिस्तानमध्ये आपले कामकाज पुन्हा सुरु करेल. यामुळे परदेशी निधी देशामध्ये येण्यासाठी एक चॅनेल उघडेल. गटाच्या सांस्कृतिक आयोगाचे प्रवक्ते अहमदुल्लाह मुत्तकी यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com