तालिबानचा मोठा दावा; पंजशीरमधील शुतार जिल्ह्यावर केला काब्जा

तालिबानने (Taliban) मुजाहिदीनच्या हवाल्याने सांगितले की, शत्रूचे मृतदेह युद्धभूमीवर पडले असून इतर अनेक जणांना जिवंत पकडण्यात आले आहे.
Taliban
TalibanDainik Gomantak

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील अनेक प्रांतावर कब्जा केला आहे, मात्र एकटा पंजशीर प्रांत (Panjshir Province) त्यांना कडवी झुंज देत आहे. यातच आता तालिबानने दावा केला आहे की, त्यांच्या लोकांनी पंजशीरमधील शुतार जिल्हा पूर्णपणे ताब्यात घेतला असून आता परवान प्रांतातून (Parwan Province) लढाई सुरु केली आहे. तालिबानने मुजाहिदीनच्या हवाल्याने सांगितले की, शत्रूचे मृतदेह युद्धभूमीवर पडले असून इतर अनेक जणांना जिवंत पकडण्यात आले आहे.

दरम्यान, थोड्या वेळापूर्वी, अशी बातमी आली होती की अहमद मसूद (Panjshir Resistance Forces) यांच्या नेतृत्वाखालील गुलबहार भागात तालिबान आणि अफगाण बंडखोरांमध्ये लढाई चालू होती. गुलबहार भाग हे ठिकाण अफगाणिस्तानातील पंजशीरचे प्रवेशद्वार मानले जाते. तालिबान्यांनी गुलबहार आणि पंजशीरला जोडणाऱ्या पुलाला चकमकीदरम्यान उडवून दिल्याचे समोर आले आहे. याच्या एक दिवस आधी, सोमवारी रात्री पंजशीर खोऱ्यात सात-आठ तालिबान लढाखे ठार झाल्याची माहिती मिळाली होती.

Taliban
अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय योग्यच:जो बायडन

दोन्ही बाजूंनी लोक जखमी लोक

अहमद मसूदचे (Ahmed Masood) प्रवक्ते फहीम दष्टी यांनी सांगितले की, तालिबानने सोमवारी रात्री पंजशीरवर हल्ला केला होता. ते पुढे म्हणाले की, दोन्ही बाजूंनी लोक जखमी झाले असून सात-आठ तालिबान लढाखे मारले गेले आहेत. रविवारी तालिबानने पंजशीरमधील इंटरनेट सेवा बंद केली होती. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, आम्ही तालिबानच्या विरोधात सध्या पंजशीरमध्ये राहून पंजशीरच्या सैन्याला पाठिंबा देत आहोत.

Taliban
Afghanistan मधून सैन्य माघार घेण्याच्या निर्णयाची इतिहासात नोंद होणार: जो बायडन

तालिबान पंजशीरपासून दूर आहे

पंजशीर हा अफगाणिस्तानातील एकमेव प्रांत आहे जिथे तालिबानला ताबा मिळवता आलेला नाही. तालिबानला विरोध करणारा जवळजवळ प्रत्येकजण त्यांना शरण आला आहे. अफजान कमांडर, अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद, ज्याला शेर ऑफ पंजशीर म्हटले जाते, त्याने येथे तालिबानच्या विरोधात सैन्य उभे केले आहे, जे तालिबानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर तो या सैन्याचे नेतृत्वही करत आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, मसूद तालिबानला शरण येऊ शकतो, परंतु जेव्हा त्याला याबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले की, तालिबान्यांना शरण जाण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com