America: फेडरल रिझर्व्हने वाढवला जगभरातील मंदीचा धोका

रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युध्दाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे.
America: फेडरल रिझर्व्हने वाढवला जगभरातील मंदीचा धोका
Federal ReserveDainik Gomantak

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युध्दाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचं नव संकट घोंघावत आहे. तर दुसरीकडे, या युध्दाचा दूरगामी परिणाम युरोपियन देशांमध्ये झालेला दिसून येत आहे. यातच आता अमेरिकेच्या (America) मध्यवर्ती बँकेने महागाई (Inflation) दर नियंत्रित करण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र यामुळे मंदीचा धोका निर्माण झाला आहे. स्टॅगफ्लेशन (Stagflation) अशी परिस्थिती आहे, जेव्हा चलनवाढीचा दर आर्थिक वाढीच्या दरापेक्षा जास्त असतो. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, अशा परिस्थितीमुळे सामान्यतः लोकांच्या रोजगार आणि वास्तविक उत्पन्नासमोरील आव्हाने वाढतात. (The US Federal Reserve has chosen to raise interest rates to control inflation)

दरम्यान, अधिक व्याजदर म्हणजे गुंतवणूकदार (Investors) कर्ज घेऊन नवीन गुंतवणूक करणे टाळतील, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होईल. याचा परिणाम थेट रोजगाराच्या वातावरणावर होईल. व्याजदर वाढीवर टीका करणाऱ्या प्रमुख तज्ञांमध्ये अमेरिकेचे माजी ट्रेझरी सेक्रेटरी लॅरी समर्स आणि अर्थतज्ज्ञ मोहम्मद अल-एरियन यांचा समावेश आहे. समर्स यांनी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख म्हणूनही काम केले. या दोन्ही अर्थतज्ज्ञांनी फेडरल रिझर्व्हच्या ताज्या भूमिकेमुळे केवळ अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगात मंदी येण्याची शक्यता आहे, असा इशारा दिला आहे.

Federal Reserve
America: विद्यार्थ्यांना मिळणार पोर्नोग्राफीचे धडे, एकत्र बसून पाहता येणार ''पॉर्न फिल्म्स''

परदेशी गुंतवणूकदार अमेरिकेत त्यांची गुंतवणूक वाढवत आहेत

अमेरिकेतील व्याजदर वाढीचा परिणाम जगभरातील शेअर आणि चलन बाजारावर जाणवत आहे. परदेशी गुंतवणूकदार उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधून पैसे काढून घेत आहेत आणि अमेरिकेत त्यांची गुंतवणूक वाढवत आहेत. त्यामुळे जिथे अमेरिकन डॉलर वधारला आहे, तिथे युरो, पाउंड, येन, युआन यासह बहुतांश देशांच्या चलनांवर परिणाम झाला आहे.

दुसरीकडे, विश्लेषकांनी असे निदर्शनास आणले आहे की, खुद्द फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल देखील या आठवड्यात चिंताक्रांत दिसले. व्याजदर वाढवण्याचे त्यांचे पाऊल महागाई नियंत्रणात आणेल. या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदर अर्ध्या टक्क्यांनी वाढवला आहे. ही घोषणा करताना पॉवेल म्हणाले - 'माझ्या मते या उचलेल्या पावलामुळे कोणतीही गंभीर मंदी येणार नाही, तर किमतींची स्थिरता पुनर्संचयित होण्याची चांगली संधी आहे.'

Federal Reserve
America Research: कोरोनाविरुद्ध 'सुपर इम्युनिटी' मिळवायची असेल...

फेडरल रिझर्व्हचा विलंब

परंतु अमेरिकेच्या अनेक अर्थतज्ज्ञांनी फेडरल रिझर्व्हच्या ताज्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, फेडरल रिझर्व्हने महागाई रोखण्यासाठी पावले उचलण्यास उशीर केला. महागाईत लक्षणीय वाढ होत असताना व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली. आता केवळ पैशांचा पुरवठा नियंत्रित करुन तो आटोक्यात येणार नाही. तर व्याजदर वाढल्याने शिक्षण, आरोग्य, घर, कार किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज घेतलेल्या लोकांच्या अडचणी वाढतील. अशा लोकांच्या कर्जाचे हप्ते वाढल्यास त्यांचा बाजारातील खप कमी होईल. दुसरीकडे, गुंतवणूकदारांचा उत्साहही कमी होईल. त्यामुळे बाजारात मंदीसारखी परिस्थिती निर्माण होईल.

Federal Reserve
America: 'पेंटॅगॉन’ मेट्रो स्टेशनजवळ गोळीबार

कॅनेडियन टीव्ही चॅनेल सीबीएस वेबसाइटने अर्थशास्त्रज्ञांच्या समालोचनात म्हटले आहे की, जग मंदीच्या मार्गावर आहे. त्यात म्हटले आहे की, अर्थात या काळात आधुनिक कालखंडाचा इतिहास लिहिला जात आहे. आपण दोन्ही वाईट गोष्टींना तोंड देत आहोत. एका बाजूला महागाई आहे, तर दुसरीकडे मंदी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.