Philippines: मार्कोस होणार विजयी? अमेरिकेची वाढली चिंता, वाचा संपूर्ण प्रकरण

फिलीपीन्सच्या (Philippines) अध्यक्षीय निवडणुकीत दिसणाऱ्या ट्रेंडबद्दल अमेरिकन सुरक्षा वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
Ferdinand Marcos Jr.
Ferdinand Marcos Jr.Dainik Gomantak

फिलीपीन्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत दिसणाऱ्या ट्रेंडबद्दल अमेरिकन सुरक्षा वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकन मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्समधून हे सूचित करण्यात आले आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या परराष्ट्र धोरणावर अमेरिका खूश नाही. परंतु आता पुढील संभाव्य अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर (Ferdinand Marcos Jr.) यांचे धोरण पूर्वीपेक्षा चीनकडे (China) अधिक झुकण्याची भीती आहे. (There is concern in American security circles about the trend in the Philippine presidential election)

Ferdinand Marcos Jr.
Philippines: ज्वालामुखीमध्ये जबरदस्त स्फोट, हजारो लोकांना सोडावी लागली घरे

दरम्यान, फिलीपिन्स (Philippines) हा पारंपारिकरित्या अमेरिकेच्या गटातील देश राहीला आहे. दोन दशकांपूर्वी, दोन्ही देशांदरम्यान एक करार झाला होता, ज्यामध्ये फिलीपिन्समध्ये अमेरिकन सैन्याच्या तैनातीची तरतूद होती. चीनचा वाढता प्रभाव रोखण्याच्या प्रयत्नात अमेरिका फिलीपिन्सच्या महत्त्वाच्या भूमिकेचा विचार करत आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनसोबतच्या सीमावादामुळे फिलिपाइन्सचे चीनसोबतचे संबंध यापूर्वी ताणले गेले होते. परंतु दुतेर्ते यांच्या कारकिर्दीत यात बदल झाला.

दुतेर्ते यांनी अमेरिकेला दिला धडा

दुतेर्ते यांनी 2016 मध्ये चीनला भेट दिली होती. दरम्यान एका महत्त्वाच्या भाषणात ते म्हणाले की, ''अमेरिकेची जगावरील पकड पहिल्यासारखी मजबूत राहीलेली नाही. मी तुमच्या वैचारिक वर्तमानाशी जुळवून घेतले आहे.'' नंतर, दुतेर्ते यांनी स्पष्ट केले की, मी अमेरिकेसोबतचा करार रद्द करणार नाही. परंतु आमच्या सरकारची धोरणे आता अमेरिका धार्जिणे राहीलेली नाहीत. दक्षिण चीन समुद्र सीमा विवादात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फिलीपिन्सच्या बाजूने निकाल दिला. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात दुतेर्ते यांनी फारसा रस दाखवला नाही.

Ferdinand Marcos Jr.
इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली एस जयशंकर यांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

दरम्यान, न्यूयॉर्क स्थित थिंक टँक, कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे वरिष्ठ फेलो, जोशुआ कुर्लांट्झिक यांनी सीएनएनशी बोलताना सांगितले की, ''अमेरिका आणि चीन या दोघांसाठी फिलीपिन्स धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्वाचा देश आहे. चीन सध्या आपल्या देशांतर्गत घडामोडींमध्ये गुंतलेला असला तरी त्याने दक्षिण चीन समुद्रात आपल्या कारवाया सुरुच ठेवल्या आहेत.''

फिलीपिन्सला सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण

सोमवार पार पडलेल्या निवडणुकीचा प्रभाव फिलिपाइन्सच्या सीमेपलीकडे जाणवेल, असे अमेरिकन विश्लेषकांनी म्हटले आहे. कुर्लांट्झिक म्हणाले, "जो कोणी निवडणूक जिंकेल, अमेरिका (America) त्यांच्याशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल." फिलीपिन्स हा सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा देश आहे. दुसरीकडे, दुतेर्ते यांची मुलगी सारा दुतेर्ते मार्कोससह उपाध्यक्षपदासाठी रिंगणात आहे. फिलीपिन्सने चीनसोबतच्या सीमावादावर द्विपक्षीय पातळीवरच चर्चा करावी, असे मत साराने व्यक्त केले आहे. म्हणजेच यामध्ये त्या अमेरिकन हस्तक्षेप टाळण्याच्या बाजूने आहेत.

Ferdinand Marcos Jr.
इस्त्रायल दुतावास स्फोट: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इस्त्रायलच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा

याशिवाय, मार्कोस यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे की, मार्कोस यांनी निवडणूक प्रचारादरम्यान चीनचे राजदूत हुआंग शिलियन यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी त्यांच्या चीन समर्थक भूमिकेचे संकेत दिले होते. या भेटीनंतर चीनचे राजदूत म्हणाले होते की, 'मार्कोस यांना भेटणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. आम्ही मिळून उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकारणार आहोत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com