अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यावर रक्तातील गाठी होण्याबाबत कोणताही वैद्यकीय पुरावा नाही...

दैनिक गोमन्तक
बुधवार, 31 मार्च 2021

युरोपमधील औषध नियामक यंत्रणेने (ईएमए) आज अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर रक्तातील गाठी होण्यासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे म्हटले आहे.

युरोपमधील औषध नियामक यंत्रणेने (ईएमए) आज अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर रक्तातील गाठी होण्यासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे म्हटले आहे. युरोपियन औषध नियामक मंडळाचे हे स्पष्टीकरण नेमके कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन यासह अनेक देशांनी अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीचा वापर काही विशिष्ठ लोकसंख्येपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयानंतर आले आहे. तसेच युरोपियन औषध नियामक मंडळाने अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे फायदे हे जोखमीपेक्षा कितीतरी अधिकचे असल्याचे म्हटले आहे. (There is no medical evidence of blood clots after taking Astrazeneca vaccine)

पाकिस्तानलाही भारताशी शांततापूर्ण संबंध हवेत; इम्रान खान यांचे नरेंद्र...

युरोपियन औषध नियामक मंडळाने (EMA) आज अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे फायदेच असल्याचे नमूद केले. मात्र त्यासोबतच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या संभावनेबद्दल  लोकांना माहिती असावी आणि लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असा इशारा युरोपियन औषध नियामक मंडळाने दिला आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतल्यानंतर रक्तात होणाऱ्या गाठी संदर्भात कोणताही वैद्यकीय पुरावा मिळाला नसल्याचे म्हणत, परंतु शक्य आहे आणि पुढील विश्लेषण चालू असल्याची माहिती युरोपियन औषध नियामक मंडळाने दिली आहे. 

हॉंगकॉंगवरील पकड मजबूत करण्यासाठी 'ड्रॅगन'कडून नवे कारस्थान 

मेंदूतील दुर्मीळ गाठ, रक्तस्त्राव आणि कमी प्लेटलेट्ससह, रक्तातील गाठी होण्याच्या काही घटना समोर आल्यानंतर युरोपियन नियामक आणि इतर अनेक राष्ट्रीय औषध नियामक यंत्रणांकडून याबाबत चौकशी करण्यास सुरवात केली होती. युरोपियन औषध नियामक मंडळाची (EMA) सुरक्षा समिती रक्तातील गाठी होण्याच्या घटनांवर लक्ष ठेवून असल्याचे युरोपियन औषध नियामक मंडळाने म्हटले आहे. 

 

संबंधित बातम्या