Imran Khan: 'वे मुझे मार डालेंगे...', इम्रान खान यांनी जारी केला व्हिडिओ

Pakistan Politics: बख्तरबंद पोलिसांचे एक पथक इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले असून ते त्यांना कधीही अटक करु शकतात.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak

Pakistan Politics: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस लाहोरमध्ये त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर हल्ला केला.

यानंतर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी संध्याकाळी एक व्हिडिओ संदेश जारी केला, ज्यामध्ये त्यांनी लोकांना तुरुंगात किंवा मारले तरी त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.

इम्रान पुढे म्हणाले की, "तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढावे लागेल, तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. मला देवाने सर्व काही दिले आहे. मी तुमचा लढा लढत आहे. मी आयुष्यभर लढलो आहे आणि लढत राहीन. त्यांनी मला तुरुंगात टाकले किंवा मला मारले तरी तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की, तुम्ही इम्रान खानशिवाय (Imran Khan) लढू शकता.''

Imran Khan
Imran Khan: इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या, इस्लामाबाद पोलिस करणार अटक

पाकिस्तानची वृत्तसंस्था डॉनने दिलेल्या माहितीनुसार, बख्तरबंद पोलिसांचे एक पथक इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले असून ते त्यांना कधीही अटक करु शकतात.

तोशाखाना प्रकरणात इम्रान यांच्यावर आधीच न्यायालयात खटला चालवला जात आहे. आता त्यांच्यावर महिला न्यायाधीश आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी न्यायालयाने (Court) अजामीनपात्र वॉरंट जारी करत त्यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com