अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस 100 टक्के प्रभावी; अमेरिकेतील तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष जाहीर

दैनिक गोमन्तक
सोमवार, 22 मार्च 2021

कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. अशातच अमेरिकेने कोरोनावरील अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला मान्यता दिली असून, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा डेटाही जाहीर केला आहे.

कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले असताना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. अशातच अमेरिकेने कोरोनावरील अ‍ॅस्ट्राझेनेका ( AstraZeneca) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला मान्यता दिली असून, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा डेटाही जाहीर केला आहे. या टप्प्यात ही लस 79 ते 100 टक्क्यांपर्यंत  प्रभावी असल्याची माहिती मिळाली आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सोमवारी याबाबतची माहिती दिली. जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी एसआयआय (Serum Institute of India) भारतामध्ये या लसीचे उत्पादन करत आहे.

सीरम इंस्टीट्यूटकडून दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील (USS) अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या आकडेवारीवरून ही लस लक्षणेजन्य रोगाविरूद्ध 79 टक्के प्रभावी आहे. तर गंभीर रोग आणि रुग्णालयात दाखल होण्यापासून रोखण्यासाठी ही लस 100 टक्के प्रभावी आहे. भारताने  अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड लसीसोबतच भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेल्या कोवॅक्सीन लसीला देखील आपत्कालीन मंजुरी दिली आहे. आणि देशात चार कोटी जणांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा सोशल मीडिया वापसी?

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्याचा अभ्यास अमेरिका, चिली आणि पेरू येथे करण्यात आला असून ही लस 'सुरक्षित आणि प्रभावी' असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. यापूर्वी लसीची चाचणी यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत झाली होती. विशेष म्हणजे ही लस या रोगापासून भरीव संरक्षण प्रदान करत असल्याचे समोर आले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लस रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची शक्यता शंभर टक्के कमी करते, म्हणजेच लसीकरणानंतर संसर्ग झाल्यासही ते रुग्ण गंभीर स्वरूपात आजारी पडणार नाही, असे  अमेरिकेतील शेवटच्या टप्प्यातील चाचणीत आढळून आले आहे.  

यानंतर, अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रुग्णांवर कोणताही दुष्परिणाम झाल्याचा पुरावा तज्ञांना मिळालेला नाही. ही लस वृद्धांसह सर्व वयोगटातील लोकांना संक्रमणापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. परंतु, किती स्वयंसेवकांना ही लसी देण्यात आली हे अद्याप कंपनीने उघड केलेले नाही. ही लस सर्व वयोगटातील आणि सर्वांवर तितकीच प्रभावी असल्याचे दिसून आले व 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये 80 टक्के प्रभावी आहे, असेही कंपनीने नमूद केले आहे.

संबंधित बातम्या