दक्षिण कोरियात कोरोनाची तिसरी लाट ; निर्बंध आणखी कडक होणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असल्यामुळे आणखी कडक निर्बंध घालण्याचा विचार दक्षिण कोरियाचे अधिकारी करीत आहेत. गेल्या नऊ महिन्यांतील संसर्गात तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

सोल :  कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असल्यामुळे आणखी कडक निर्बंध घालण्याचा विचार दक्षिण कोरियाचे अधिकारी करीत आहेत. गेल्या नऊ महिन्यांतील संसर्गात तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंतप्रधान चुंग स्यी-क्युन यांनी आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलवली आहे. जागतिक साथ सुरू झाल्यापासून नव्या रुग्णांची सर्वाधिक वेगाने वाढ झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले. रविवारी 450 नवे रुग्ण आढळले. त्याआधी सलग तीन दिवस ही संख्या पाचशेहून जास्त होती. मंगळवारी बृहन सोल विभागात दुसऱ्या पातळीचे निर्बंध लागू करण्यात आले. दक्षिण कोरियाच निर्बंधांची पंचस्तरीय पद्धत आहे.

संबंधित बातम्या