Ukraine: झेलेन्स्कींचा मोदींसाठी गुप्त संदेश? युक्रेनची 'ही' महिला मंत्री भारतात येणार

Emine Dzhaparova: युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री एमीन जापरोवा रविवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत.
Emine Dzhaparova
Emine DzhaparovaDainik Gomantak

Emine Dzhaparova: युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्री एमीन जापरोवा रविवारपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. जापरोवा भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील (एमईए) सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांच्याशी चर्चा करतील. युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेन भेटीचे निमंत्रण देऊ शकतात, अशी शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात जापरोवा यांच्या भारत भेटीची घोषणा केली. त्यात म्हटले आहे की, "युक्रेनचे (Ukraine) प्रथम उप परराष्ट्र व्यवहार मंत्री एमीन जापरोवा 9 ते 12 एप्रिल दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील."

Emine Dzhaparova
Ukraine: युक्रेनच्या मोठ्या मंत्री येणार भारत भेटीला, रशियासोबतच्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारत दौरा

त्यात पुढे म्हटले आहे की, जापरोवा वर्मा यांच्याशी चर्चा करतील, ज्या दरम्यान दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय संबंध, युक्रेनमधील सद्यस्थिती आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करणे अपेक्षित आहे.

जपरोवा परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचीही भेट घेणार असून उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांचीही भेट घेणार आहेत.

दुसरीकडे, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेव्हा युक्रेनचा संघर्ष सुरु झाला तेव्हा पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) तसेच युक्रेनचे नेते वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी अनेकदा चर्चा केली.

Emine Dzhaparova
Russia Ukraine War: युक्रेनियन लष्कराचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला, मॉस्कोमध्ये घबराट

त्याचबरोबर, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही. मुत्सद्देगिरी आणि संवादाने हे संकट सोडवले जावे, असे भारताचे म्हणणे आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताचे युक्रेनसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. "राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून गेल्या 30 वर्षांत, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्याने व्यापार, शिक्षण, संस्कृती आणि संरक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे," असे निवेदनात म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ही भेट परस्पर सामंजस्य आणि हितसंबंध वाढवण्याची संधी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com