Ro Khanna: भारतीय वंशाची 'ही' व्यक्ती 2024 मध्ये बनू शकते अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष

बायडेन यांनी निवडणूक न लढविल्यास असतील डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार
Ro Khanna | America
Ro Khanna | AmericaDainik Gomantak

Ro Khanna: कॅलिफोर्नियातील युएस काँग्रेसचे सदस्य रो खन्ना यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ते कॅलिफोर्नियामधून सिनेटसाठी उभे राहण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. तथापि, त्यांच्या डेमोक्रेटिक पक्षात मात्र खन्ना यांचे ध्येय यापेक्षा खूप मोठे आहे, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. भारतीय-अमेरिकन खासदार असलेल्या खन्ना यांच्या जवळच्या असलेल्या काही लोकांनी ते 2028 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी त्यांचे पर्याय खुले आहेत. जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 2024 ची निवडणूक लढवली नाही तर रो खन्ना हे त्या निवडणुकीत आव्हान निर्माण करू शकतात.

खन्ना यांच्या सल्लागाराने सांगितले की, जर बायडेन यांना 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी करायची नसेल, तर खन्ना हे 'संभाव्य उमेदवार' असल्याचे दिसते. डेमोक्रॅटिक स्ट्रॅटेजिस्ट मार्क लाँगबॉग यांनी POLITICO या वेबपोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, खन्ना हे एक "चांगले सिनेटर" बनतील. न्यू हॅम्पशायर आणि नेवाडा प्राइमरीजचे दिग्गज असलेल्या डेमोक्रॅट अधिकार्‍यांना रो खन्ना यांनी आत्तापर्यंत कायम ठेवले आहे. लाँगबॉग यांच्या फर्मने यापुर्वी रो खन्ना यांच्यासाठी मीडिया सल्लामसलतही केली होती.

खन्ना यांनी म्हटले आहे की जर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पूर्ण पाठिंबा देतील. राष्ट्राध्यक्षांनी पुन्हा निवडणूक न लढवल्यास व्हाईट हाऊससाठी निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खन्ना यांनी न्यूज पोर्टलला सांगितले की डेमोक्रॅट आणि बर्नी सँडर्स समर्थकांमधील पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांना सिनेटसाठी उमेदवारी जाहीर करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. मी त्यांना सांगितले आहे की मी पुढील काही महिन्यांत हे करेन."

कोण आहेत रो खन्ना

रो खन्ना (Ro Khanna) हे सध्या कॅलिफोर्नियाचे खासदार आहेत. त्यांचे मूळ नाव रोहित खन्ना असे आहे. त्यांचा जन्म फिलाडेल्फिया, पेंसिल्वेनिया येथील एका भारतीय पंजाबी कुटूंबात झाला. खन्ना यांचे आई-वडील पंजाबमधून अमेरिकेत आले होते. खन्ना यांचे वडील केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी IIT आणि नंतर मिशिगन यूनिवर्सिटीमधून पदवी घेतली. खन्ना यांची आई माजी शिक्षिका आहे.

रो खन्ना हे खासदार बनण्यापुर्वी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होते. तसेच ओबामा प्रशासनात त्यांनी डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. रो खन्ना यांनी यूनिवर्सिटी ऑफ शिकागो मधून इकनॉमिक्समधून पदवी घेतली आहे तसेच येल यूनिवर्सिटीतून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com