फ्रान्समध्ये रेव्ह पार्टीला हजारोंची हजेरी

दैनिक गोमन्तक
रविवार, 3 जानेवारी 2021

कोविडमुळे फ्रान्समध्ये निर्बंध लागू असताना ब्रिटनी प्रांतातील एका बेकायदा रेव्ह पार्टीला सुमारे अडीच हजार लोक उपस्थित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पॅरिस: कोविडमुळे फ्रान्समध्ये निर्बंध लागू असताना ब्रिटनी प्रांतातील एका बेकायदा रेव्ह पार्टीला सुमारे अडीच हजार लोक उपस्थित असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुळे फ्रान्स सरकारने कडक उपाय केलेले असताना नागरिकांनी त्यांना जुमानले नसल्याचे उघडकीस आले आहे. 

अधिकाऱ्याने म्हटले की, ३१ डिसेंबरच्या सायंकाळी लियुरॉन शहरातील औद्योगिक भागात शेकडो वाहने दिसली. या ठिकाणी बेकायदारित्या रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. याबाबतची खबर पोलिसांना लागतात ती पार्टी बंद पाडली. परंतु तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही संतप्त नागरिकांनी पोलिसाच्या एका वाहनाला आग लावली तर अन्य तीन वाहनांची तोडफोड केली. यावेळी जवानांच्या अंगावर नागरिकांनी बाटल्या, दगड फेकले. 
त्यामुळे अनेक जवान किरकोळ जखमी झाले. 

पोलिसांच्या अंदाजानुसार या पार्टीला २५०० नागरिक हजर होते. काही जण फ्रान्सच्या विविध भागातून आले होते तर काही परदेशातूनही आले होते. कोरोनामुळे सरकारने १५ डिसेंबरपासून सायंकाळी ८ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू केलेली असताना रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या