अमेरिकेत पुन्हा वर्णद्वेषाविरोधात हजारो लोक उतरले रस्त्यावर

america'.jpg
america'.jpg

अमेरिकेत दिवसेंदिवस वर्णद्वेषामुळे होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. वर्णद्वेषामुळे होणाऱ्या गुन्ह्यांविरूद्ध शिकागो आणि न्यूयॉर्कमध्ये हजारो लोकांनी निदर्शने सुरु केली आहेत. वर्णद्वेषामुळे (Racism) होणारा भेदभाव आणि त्या संबंधितच्या गुन्ह्यांविरुद्ध शिकागोच्या चायना टाऊन चौकात हजारो लोक रस्त्यावर उतरले. या सर्वांकडे 'स्टॉप एशियन हेट', 'जीरो टॉलरेंस फॉर रेसिजम' अशा घोषणांचे फलक सुद्धा दिसून आले. (Thousands strike in US over racism) 

अटलांटामध्ये  16 मार्च रोजी  8 जणांची हत्या करण्यात आली होती, त्यातील सहा आशियाई वंशाच्या स्त्रिया होत्या. त्यानंतर सलग अशा अनेक घटना घडल्या. लोकांची सुरक्षा वाढविणे, जातीय हिंसाचाराच्या गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र वेबसाइट्स, हिंसाचारग्रस्तांसाठी निधी, तसेच या प्रकरणाची तातडीने घेण्यात यावी या मागण्या घेऊन हे आंदोलक निदर्शने करत होती. न्यूयॉर्कमध्येही वांशिक हिंसाचाराविरोधात निदर्शने करण्यात आले. या निदर्शनात 25 राज्यांमधील 60 हून अधिक शहरांमधील लोकांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दिसून आले. न्यूयॉर्कमध्ये नुकत्याच झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर दहापेक्षा जास्त मोर्चे आयोजित करण्यात आले होते. अनेक प्रकरणात दोष नसताना कृष्णवर्णीय लोकांना त्रास दिला जातो असा आरोप करत अमेरिकन पोलिसांबद्दल आंदोलकांच्या मनात रोष असल्याचे दिसून येते. 

यापूर्वी अमेरिकेत पोलिस कोठडीत कृष्ण वर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या(jorge floyd) मृत्यूनंतर देशभरात हिंसक निदर्शने झाली होती. या निदर्शनात किमान पाच जणांचा मृत्यू झाला होता तसेच चार हजार लोकांना अटक करण्यात आली  होती.  या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारात कोट्यवधी डॉलर्सच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trup) यांनाही व्हाईट हाऊसच्या बाहेर सुरु असलेल्या जोरदार निषेधामुळे बंकरमध्ये लपावे होते. त्या घटनेनंतर जॉर्ज फ्लॉइड अमेरिकेत (America) न्याय आणि समानतेच्या मागणीचे प्रतीक बनले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com