संसदच महिलांसाठी असुरक्षित; ऑस्ट्रेलियात हजारो स्त्रिया उतरल्या रस्त्यावर

संसदच महिलांसाठी असुरक्षित; ऑस्ट्रेलियात हजारो स्त्रिया उतरल्या रस्त्यावर
Thousands of women took to the streets in Australia as Parliament was unsafe for women

कामाच्या ठिकाणी सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यावरून ऑस्ट्रेलियात हजारो महिला रस्त्यावर उथरल्या आहेत. यात अनेक महिला खासदार सहभागी असून त्यांनी गंभीर असे आरोप केले आहेत. यामध्ये संसदेत पुरुष स्वत:ला राजा समजतात आणि महिलांसोबत लैंगिक गैरवर्तन केलं जातं. अनेक नेत्यांनी जबरदस्तीनं स्पर्श केला तर अनेकांनी बेअब्रू केलं. अनेक महिला खासदारांनी संसदेला कामाच्या दृष्टीनं महिलांसाठी असुरक्षित असं म्हटलं आहे. (Thousands of women took to the streets in Australia as Parliament was unsafe for women)

महिलांच्या म्हणण्यानुसार जेव्हा जेव्हा पुरुषांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केला गेला तेव्हा उलट त्यांच्याच चारित्र्याकडे बोट केलं गेलं. त्यावेळी महिला गप्प बसल्या. पण माजी कर्मचारी ब्रिटनी हिगिन्स यांनी संरक्षणमंत्री कार्यालयात बलात्काराची बातमी ऐकली तेव्हा हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. शेवटी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील संसदेची परिस्थिती सुधारली पाहिजे असे म्हटलं. 

"संसद येवून 80 च्या दशकात आल्यासारख वाटलं..."
ज्युलिया बँक्स म्हणाल्या की, "जेव्हा पाच वर्षांपूर्वी मी संसदेत पोहचले तेव्हा पुरुषांच्या वागणुकीमुळे त्यांना 80 च्या दशकात आल्यासारखे वाटले" संसदेत कामकाज सुरु असतानाच अनेक पुरुष खासदारांच्या तोंडाला दारुचा वास यायचा. काही नेत्यांच्या चर्चेत महिलांचे खासगी जीवनाचे विषय असायचे. त्यांच्याबद्दल अफवा आणि विनोद सुरु असत. 

अनेक मुलाखतींमध्ये, विद्यमान आणि माजी खासदारांनी संसदेला 'टेस्टोस्टेरॉनचे तळघर' म्हटले होते. टेस्टोस्टेरॉन असं ठिकाण असतं जिथं प्रत्येक मंत्र्याच्या खोलीतील फ्रीज ही दारूने भरलेली असते.

कामगार पक्षाच्या नेत्या तान्या लिबेरसेक म्हणाल्या की, संसदेशी संबंधित महिलांमध्ये दीर्घकाळ रोष निर्माण झाला आहे. इतर संस्थांमध्ये लैंगिक समानतेला वेग आला आहे, परंतु स्थापनेत पुरुषांचेच वर्चस्व आहे. स्त्रिया पुरुषांची नावे सांगण्यास असमर्थ आहेत कारण नोकरी किंवा न्याय असे दोन पर्याय त्यांच्यासमोर असतात. न्याय हवा असेल तर नोकरी गमावण्याची भीती त्यांना असते. या दबावामुळे अनेक महिला पुढे येत नाही. 

विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियामध्ये महिला विरोधाची समस्या सर्वत्र आहे, परंतु संसद त्याच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनी नव्या आरोपांना देशातील मी टू मोहिमेचे पुनरुत्थान म्हटले आहे. देशातील राजकीय बदलांसाठी महिलांची ही त्सुनामी होऊ शकते. ऑस्ट्रेलियन संसदेत बहुतेक खासदार आणि कर्मचारी पुरुष आहेत. गेल्या 20 वर्षांत लिंग-विविधतेच्याबाबतीत ऑस्ट्रेलिया 15 व्या स्थानावरुन 50 व्या स्थानावर घसरला. सत्ताधारी पक्षातील ८० टक्क्यांहून अधिक खासदार पुरुष आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com