Palindrome Date Today: 22/02/2022 आकड्यांचे खेळ !

आज 22/02/2022 हा दुर्मिळ दिवस असून याला मिरर डे म्हणून ओळखले जाते.
Palindrome Date Today
Palindrome Date TodayDainik Gomantak

आजची तारीख ही खूप खास आहे. यापूर्वी आजची जशी तारीख आहे तशी क्वचितच पाहिली असेल. आज 22/02/2022 ही खास तारीख आहे. तुम्ही या तारखेमध्ये बारकाइने पहिले तर तुम्हाला आज काय विशेष आहे हे समजू शकेल. आज नेमके काय खास आहे जे जाणून घेऊया

* पॅलिंड्रोम वर्ड आजची तारीख (Palindrome Word)

आजची तारीख ही एक पॅलिंड्रोम (Palindrome) आहे. पॅलिंड्रोम म्हणजे असे शब्द (Word) , अक्षरे किंवा ओळी जे समोरून वाचले तरी एकच अर्थ होतो आणि मागून वाचले तरी तोच अर्थ होतो. उदाहरणार्थ: MADAM आणि REFER तिच गोष्ट आज 22/02/2022 ला लागू होते. म्हणजेच सरल किंवा उलटे वाचा अर्थ एकच होईल.

Palindrome Date Today
युक्रेनमधील मेट्रो स्टेशन पाहिलयं का? जाणून घ्या या देशातील मनोरंजक तथ्ये

* अँबिग्राम शब्द देखील आहे (Ambigram Words)

आजच्या तारखेचा सर्वात मोठा योगायोग म्हणजे पॅलिंड्रोम शब्द असण्यासोबतच तो एक अँबिग्राम शब्द आहे. अँबिग्राम म्हणजे शब्द, रेषा किंवा तारीख जी सरळ आणि उलटी सारखीच राहते. म्हणजे सरळ वाचली तरी त्या शब्दातून तोच अर्थ निघतो जो शब्द उलटा वाचला तरी तोच अर्थ निघतो. यामुळे आजची तारीख खास मनाली जात आहे. आजची तारीख तुम्ही कशीही वाचली तरी अर्थ एकच निघणार आहे.अशा तारखाचा योगायोग या पूर्वी देखील येवून गेला आहे. ज्या पॅलिंड्रोम आणि अँबिग्राम तारखा म्हणून ओळखल्या जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com