मेक्सिकोत भीषण अपघात; मेट्रो ट्रेनसह पूल कोसळला

मेक्सिकोत भीषण अपघात; मेट्रो ट्रेनसह पूल कोसळला
A tragic accident in Mexico The bridge with the metro train collapsed

मेक्सिकोची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटीमध्ये (Mexico City) मोठी दुर्घटना झाली आहे. मेक्सिको सिटीमध्ये मेट्रोचा एक पूल कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. ही मोठी दुर्घटना घडली तेव्हा मेट्रो ट्रेन पूलावरुन जात होती. सोमवारी झालेल्या या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 70 लोक जखमी झाले आहेत. 

मेक्सिकोच्या अधिकाऱ्यांनी माध्यमाला दिलेल्या माहीतीनुसार, रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. ही भीषण दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यामध्ये मेट्रो पूल रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहनांवर कोसळताना दिसत आहे. (A tragic accident in Mexico The bridge with the metro train collapsed)

दुर्घटनेची माहीती मिळताच वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत युध्दपातळीवर बचावकार्यास सुरुवात केली आहे. मेक्सिको सिटीच्या मेयर क्लॉडिया यांनी 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक वाहनांचं नुकसान झालं असल्याची माहीती होती. दरम्यान 49 लोक जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सोलो एबरार्ड मेक्सिको सिटीचे मेयर असताना मेट्रोच्या लाईनचं काम करण्यात आलं होतं. ट्विट करत त्यांनी ही अत्यंत भीषण दुर्घटना असल्याचं सांगत पिडितांच्या कुटुंबासाठी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे. मदतीसाठी जी काही मदत लागेल ती करण्यात येईल असंही असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com