तैवानमध्ये रेल्वे अपघात; 36 जणांचा मृत्यू तर 72 हून अधिक गंभीर जखमी 

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

तैवानमध्ये टॉम्ब स्वीपिंग फेस्टिव्हलच्या आनंदाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. तैवानच्या पूर्व भागात रेल्वे रुळावरून घसरल्याने अपघात झाला. या अपघातात  ३६ लोकांचा मृत्यू झाला असून ७२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

तैपेई :  तैवानमध्ये टॉम्ब स्वीपिंग फेस्टिव्हलच्या आनंदाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. तैवानच्या पूर्व भागात रेल्वे रुळावरून घसरल्याने अपघात झाला. या अपघातात  ३६ लोकांचा मृत्यू झाला असून ७२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बोगद्यात झाल्याने मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघाताने नागरिक चांगलेच धास्तावल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.  तर घटनेची माहिती मिळताच बचाव दलाने घटनास्थळी धाव घेत जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून केले आहेत, त्याचबरोबर अजूनही बचावकार्य सुरू आहे. पण या दुर्घटनेमुळे सर्वांच्या आनंदावर पाणी फेरले गेलं आहे. 

स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. टॉम्ब स्वीपिंग फेस्टिव्हल सुरू असल्याने येथील नागरिक सुट्टीचा आनंद घेत होते. सुट्टीनिमित्त अनेक तैवानी नागरिक रेल्वे आणि बसने प्रवास करत होते. तथापि, अपघात झालेली रेल्वे तैटुंगला निघाली होती.  अपघातग्रस्त रेल्वे तैटुंगच्या दिशेने जात असताना बोगद्याजवळ एक ट्रक रेल्वे रुळावर  पडला होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. यावेळी ३५० प्रवासी रेल्वेमधून प्रवास करत होते. रेल्वे रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. बोगद्यात रेल्वे भिंतीला धडकल्याने मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

चीनचा मोठा निर्णय; जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण खगोलशास्त्रज्ञांकरिता...

तथापि, पूर्व तैवानमधील अपघात झालेला हा रेल्वेमार्ग पर्यटकांच्या आवडीचा रेल्वेमार्ग असल्याने या मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशातच रेल्वे बोगद्यातच पलटी झाल्याने बचवकार्यातही अडचणी येत आहेत. अपघातानंतर प्रवासी जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडत होते. या दुर्घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होऊ लागले आहेत. 

दरम्यान, ऑक्टोबर २०१८मध्येही तैवानमध्ये असाच भीषण अपघात झाला होता. त्यावेळीही उत्तर-पश्चिम सीमा भागात एक एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरल्याने १८ लोक मृत्यूमुखी पडले होते,  तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते. तर  १९९१ मध्येही  झालेल्या रेल्वे अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला होता. 

संबंधित बातम्या