ट्विटरची माफी अपुरी; स्पष्टीकरण चुकीचे

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

भारताच्या लडाखला चीनचा भाग दर्शविणे ट्विटरच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. ट्विटरकडून मागण्यात आलेली माफी अपुरी असून, त्यांचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यामुळे सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे मत संसदीय समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी लेखी यांनी मांडले.

नवी दिल्ली : भारताच्या लडाखला चीनचा भाग दर्शविणे ट्विटरच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. ट्विटरकडून मागण्यात आलेली माफी अपुरी असून, त्यांचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यामुळे सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे मत संसदीय समितीच्या अध्यक्ष मीनाक्षी लेखी यांनी मांडले.

संसदेने डेटा संरक्षण विधेयक-२०१९ च्या अनुषंगाने स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला नुकतेच ट्विटरचे प्रतिनिधी सामोरे गेले होते. लडाखला चीनचा भाग दाखविल्याने त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. या चुकीबद्दल ट्विटरकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण पूर्णपणे चुकीचे आहे, यावर समितीचे एकमत झाले आहे. भारताच्या भावनांचा आदर करतो असे ट्विटरने म्हटले आहे; पण हा प्रश्‍न संवेदनशीलतेचा तसेच सार्वभौमत्व आणि एकतेचा आहे. लडाखला चीनचा भाग दाखविणे हा गुन्हा असून त्यामुळे कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे लेखी यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या